IND vs SA 2nd Test 2019: विराट कोहली च्या 7 व्या द्विशतकावर Netizens ने केला कौतुकाचा वर्षाव, पहा Tweets
विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

पुणे चाललेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने आपल्या करिअर मधलं ७ वं द्विशतक ठोकलं आहे. हे त्याच्या कारकिर्दीमधला कर्णधार म्हणूनही ७ व द्विशतक आहे. कोहली आधी भारताकडून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग दोघांनीही ६ द्विशतकं ठोकली होती. तर वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने या आधी कर्णधार म्हणून ५ द्विशतक केली होती.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ५९ धाव करून बाद झाला. मयांक अग्रवाल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या खेळींमुळे या सामन्यात भारत सुस्थितीत पोचला आहे. या आधी विशाखापट्टणमला झालेल्या सामन्यात, शमीच्या ५ बळींच्या बळावर भारताने आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला होता. आता दुसरा आमना जिंकला तर भारत ही मालिका जिंकेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप मध्ये अग्रस्थानी राहण्यासाठी हा मालिका विजय महत्वाचा आहे.

विराटचं कौतुक करणारी काही ट्विट्स:

भारताचा स्कोर ५०० च्या पुढे गेला आहे. कालच्या दिवशी मयांक अग्रवालने आपलं दुसरा शतक ठोकलं होतं. तर जडेजानेसुद्धा फिफ्टी मारली आहे.