RCB vs CSK Weather Update: आयपीएल 2024 (IPL 2024) अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अव्वल 3 संघ जाहीर झाले असून, उर्वरित एका जागेसाठी लढत सुरू आहे. आयपीएल प्लेऑफ पात्रतेच्या दृष्टिकोनातून, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs CSK) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जाईल. हा सामना शनिवार, 18 मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे होणार आहे. मागील पाच सामने जिंकून आरसीबीने वेग पकडला आहे. अशा परिस्थितीत आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पण बंगळुरूचे हवामान संघाला अनुकूल असावे लागेल. जर हा सामना पावसामुळे वाहून गेला तर प्ले ऑफमध्ये कोण पोहोचेल ते आम्ही तुम्हाला सांगू.... (हे देखील वाचा: RCB vs CSK Head to Head: 'करो या मरो' सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने, आकडेवारीत कोण आहे वरचढ? घ्या जाणून)
4 pm weather update exclusive visuals from inside chinnaswamy stadium cloudy weather in namma bengaluru #RCBvCSK #CSKvsRCB#IPL2024 #Crickettwitter pic.twitter.com/eZH3WC1S3a
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) May 18, 2024
पाऊस पडला तर कोणाल होणार फायदा?
हा सामना आरसीबीसाठी 'कोरो या मरो असा' असेल. आरसीबीला प्लेऑफमध्ये जायचे असेल, तर चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. चेन्नईला पराभव पत्करावा लागला तरी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी असेल. हैदराबादने पुढचे दोन सामने गमावले तर चेन्नई सुपर किंग्ज सहज प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. अशा परिस्थितीत हा सामना पूर्णपणे खेळला गेला आणि निकाल आरसीबीच्या बाजूने आला तर आरसीबीसाठी चांगले होईल. पण जर हा सामना खेळता आला नाही किंवा पावसामुळे सामना वाहून गेला तर आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि सीएसकेला प्लेऑफचे तिकीट मिळेल.
आरसीबी प्लेऑफसाठी कशी पात्र ठरेल?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केवळ विजयाची गरज नाही तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी केली तर त्यांना 18.1 षटकात सीएसकेला बाद करावे लागेल. आरसीबीने प्रथम फलंदाजी केल्यास 18 धावांनी विजय मिळवावा लागेल.