सुरपाट्या (Surpatya) किंवा आट्यापाट्या (Atya Patya) हा एक महाराष्ट्राच्या मातीतला ग्रामिण खेळ (Village Games). अलिकडे मोबाईल, इंटरने यांमुळे ऑनलाईन गेम खेळण्याकडे कल वाढला आहे. तसेच, मैदानी खेळांमध्ये व्यावसायीक खेळांना प्राधान्य आल्याने गावाकडचे खेळ (Outdoor Games in Maharashtra) काहीसे मागे पडले आहेत. परंतू तरीही या खेळांनी अनेकांचे बालपण (Childhood Games) समृद्ध केले आहे. सुरफाट्या हा खेळही त्यापैकीच एक.
आज व्यावसायिक खेळांनी आणि ऑनलाईन गेमिंगने कितीही बाळसे धरले तरी, या खेळांची सर त्याला अजिबात नाही. तसेच, व्यक्तिगतता वाढल्याने मुलांचा (मोठ्यांचाही) स्क्रिन टाईम वाढल्याने व्हिडिओ गेमने बाळसे धरल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी ती एक प्रकारची सूज आहे. कारण, बैठ्या खेळांमुळे (व्हिडिओ गेमींग) स्थुलता आणि अनेक व्याधीही वाढत आहेत. त्यामुळे मातीतले खेळ केव्हाही सरस ठरतात. मोबाईल आणि इंटरनेटच्या दुनियेत हरवलेल्या अनेकांना मैदानी खेळ म्हणजे केवळ क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि कबड्डी आठवतात. तेही त्यांना टीव्हीसारख्या प्रभावी माध्यमांतून जाहिरातबाजी केल्याने त्यांच्यपर्यंत पोहोचलेले असतात. परंतू, गोट्या, लगोर, सुरपाट्या, टायर पळविणे, विटीदांडू, सुरपारंब्या, हांटरपाणी, अंडापाणी, शिवनापाट, पाण्यातली शिवानापाणी यांसारखे खेळ बहुतांशांना माहिती नसतात. अशा वेळी या खेळांचे नाव जरी काढले तरी अनेकांना आपले बालपन आठवते. अशा मंडळींसाठी आज इथे खास सुरपाट्या खेळाविषयी. सुरपाट्या हा खेळ परंपरेने चालत आला आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातही या खेळाबात उल्लेख आढळतो. याचा अर्थ त्याही आधीपासून हा खेळ महाराष्ट्रात खेळला जात असावा.
खेळाचे नियम
चार किंवा त्याहून अधिक सम संख्येत असलेले कितीही लोक हा खेळ खेळू शकतात. या खेळाला विशेष असे काही नियम सुरुवातीला नव्हते. परंतू, 1914 मध्ये डेक्कन जिमखाना पुणे यांनी या खेळाचे अधिकृत असे काही नियम केल्याचे आढळते. त्या आधी केवळ खेळाडूंच्या प्रमाणात कोंडी (चौकटी) आखून त्यात विरुद्ध संघाच्या खेळाडूसाठी एक मर्यादीत रेशांतील जागा ठरवून देणे आणि डाव सुरु करणे अशी या खेळाची पद्धत. (हेही वाचा, स्मृती खेळांच्या: दुर्मिळ होत चाललेला 'विटी-दांडू')
खेळाडूंची संख्या
हा खेळ खेळण्यासाठी दोन संघ असतात. प्रत्येक संघात साधारण 9 खेळाडू असतात.प्रत्येक पाटीसाठी (सूरपाटी आणि चांभारपाटी) एक आणि प्रत्येक पाटीत (कोंड्यात) एक खेळाडू असतो. असे आठ खेळाडू असतात उर्वरीत पंच असतात. दोन्ही संघाचे गुण लिहिण्यासाठी गुणलेखकही नेमला जातो.
खेळाचे साहित्य
हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साहित्याची गरज लागत नाही. फक्त मोकळे मैदान आवश्यक असते. मोकळ्या मैदानात दोन उभ्या आणि दोन आढव्या रेशा विशिष्ट पद्धतीने मारल्या की खेळासाठी सुरुवात करता येते. खेळाची रचना पाहण्यासाठी खालील चित्र क्रमांक 1 पाहा.
चित्र क्र.1
डेक्कन जिमखान्याचे सुरपाट्या खेळाचे नियम
सुरुवातीला 1914 मध्ये डेक्कन जिमखाना आणि त्यानंतर बडोद्याच्या हिंदविजय जिमखान्याेही या खेळांसाठी वेगळे नियम केले. त्यानंतर या खेळाचे अधिक व नियमबद्ध असे अखील भारतीय सामनेही सुरु झाले. पुढे 1935 मध्ये या खेळाला अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने अत्याधुनिक स्वरुप देत त्याची आकर्षक आणि सांघीक मांडणी केली. त्यानंतर बहुदा सर्वत्र याच नियमांनी हा खेळ खळला जातो.
खेळाची रचना
प्रचलित नियमांनुसार हा खेळ खेळायचा तर सूरपाटी आणि इतर नऊ पाट्यांमध्ये मैदान (क्रीडांगण) विभागले जाते. याला कपाळपाटी किंवा चांभारपाटी (हा जातीवाचक शब्द असल्याने शक्यतो उच्चारला जात नाही) असे म्हणतात. अगदी शेवटची पाटी असते तिला लोणपाटी म्हणतात. सर्व पाट्यांना जी पाटी दुभंगून जाते त्याला मृदंगपाटी आणि सूरपाटी म्हणतात. त्यावर उभ्या असलेल्या खेळाडूस मृदंग आणि सूर म्हणतात.
मैदानाची रचना
मैदानाची रचना (क्रीडांगण) करताना चांभारपाटी किंवा कपाळपाटी, लोणपाटी या दोन्हींची लांबी 7.03 मीटर, सूरपाटी किंवा मृदंगपाटी यांची लांबी 27.15 मीटर असते. दोन्ही पाट्यांमधील अंतर 3.35 मीटर इतके असते.
कसे खेळाल
कोणत्याही खेळाप्रमाणे या खेळातही दोन संघ एमकेकांसमोर उभे ठाकतात. त्यातील एक संघ लोणपाटीत खेळतो दुसरा चांभारपाटीत. जो खेळाडू चांभारपाटी ओलांडून पुढे जातो तेव्हा लोण होतो. (गुण मिळतो.) दुसऱ्या संघातील खेळाडू (पाटी धरणारे) पाट्यांवर उभे असतात. ते लोणपाटीत खेळणाऱ्या खेळाडूंना अडवतात. लोणकडे धावणाऱ्या खेळाडूंना जर पाटीवाल्यांनी अडवले, शिवले तर तो खेळाडू बाद होतो. असे करत हा खेळ खेळला जातो.
महत्वाची टीप: ज्यांनी हा खेळ खेळला आहे त्यांना वरील माहिती लगेच समजेल. ज्यांना हा खेळ खेळायचा आहे परंतू समजला नाही. अथवा माहिती करुन घ्यायची आहे अशा मंडळींनी या खेळातील जाणकार किंवा क्रीडा अभ्यासकांशी संपर्क साधलेलेल केव्हाही चांगले.