
Virat Kohli New Record: आयपीएल 2025 मध्ये कालच्या सामन्यात 20 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध अर्धशतक झळकावून विराट कोहलीने लीगमध्ये इतिहास रचला आहे. या सामन्यात विराट कोहलीने पंजाब किंग्ज विरुद्ध 54 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये त्याने 7 चौकार आणि एक षटकार मारला. या हंगामातील विराट कोहलीचे हे चौथे अर्धशतक होते. तर लक्ष्याचा पाठलाग करताना हे तिसरे अर्धशतक होते. विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 50 धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा ऐतिहासिक विक्रम मोडला. मुल्लानपूरमध्ये शानदार खेळी करण्यापूर्वी, विराटने डेव्हिड वॉर्नरसोबत 66-66 अर्धशतकांसह बरोबरी साधली होती. याशिवाय, कोहलीने आता टी-20 क्रिकेटमध्ये संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. वॉर्नर 116 अर्धशतकांसह यादीत अव्वल स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक 50+ धावा
Virat Kohli breaks yet another record 🔥#ViratKohli #RCBvPBKS #IPL pic.twitter.com/4ptR7g1DGD
— Cricbuzz (@cricbuzz) April 20, 2025
आरसीबीने पंजाब किंग्जचा सात विकेट्सने पराभव केला. पहिल्या डावात यजमान संघाला फलंदाजीमध्ये संघर्ष करावा लागला. त्यांनी नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला. सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. शेवटी, शशांक सिंग आणि मार्को जेन्सेन यांच्यातील महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे संघाला 157 धावा करता आल्या.