Independence Day 2020: 74 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त भारताची क्रीडा जगातील 'या' खास कामगिरी जाणून तुम्हीही म्हणाल 'चक दे इंडिया'!
1983 क्रिकेट वर्ल्ड कप आणि अभिनय बिंद्रा ऑलिम्पिक गोल्ड (Photo Credit: Facebook/PTI)

Independence Day 2020 Special: 73 वर्षांपूर्वी, जेव्हा ब्रिटीशांच्या राजवटीतून (British Rule) भारताला स्वातंत्र्य (Indian Independence) मिळाले, तेव्हा प्रत्येक क्षेत्राला नवीन उर्जा घेऊन देशाला पुढे जाण्याची संधी मिळाली. “मध्यरात्री 12 च्या ठोक्याला जेव्हा जग झोपी गेलंय तेव्हा भारत जागा होणार आहे, एका नव्या प्रकाशात भारत नवा जन्म घेणार आहे,” असे भारताचे पहिले माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी याच शब्दातून स्वातंंत्र्याची घोषणा केली होती.  भारत यावर्षी 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. 15 ऑगस्ट 202, स्वातंत्र्याची 73 वर्षे पूर्ण करीत भारताने विकास, समृद्धी आणि स्थिरतेच्या दिशेने वाटचाल केली. भारतीय लोक राष्ट्रीय उत्सव म्हणून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर म्हणजे 1947 पासून आजवर भारताने प्रत्येक क्षेत्रात बरीच मोठी कामगिरी केली आहेत. (Independence Day 2020: भारताच्या विषयी 'या' गोष्टी अगदी मोजक्या लोकांंना आहेत ठाउक, स्वातंत्र्य दिनी तपासुन पाहा तुमचंं ज्ञान)

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, खेळ' हे एक असे वाहन बनले ज्याने जगाला भारताची ओळख पटवून देण्यात मोलाचे योगदान दिले. या लेखात आम्ही तुम्हाला 'त्या' खास क्षणांबद्दल सांगणार आहोत जे गेल्या सात दशकांत भारतीय क्रीडा विश्वात एक उदाहरण बनले. 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या (74th Independence Day) या विशेष दिवशी खेळाडूंनी जेव्हा जगासमोर देशाचा गौरव वाढवला अशा क्रीडा इतिहासातील (Sports History of India) प्रसंगांबद्दल जाणून घेऊया. या बद्दल जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही अभिमानही वाटेल आणि म्हणाल, 'चक दे इंडिया!'

1. लंडनमधील 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इंग्लंडला 4-0 ने पराभूत केले आणि स्वतंत्र देश म्हणून पहिले सुवर्णपदक जिंकले.

2. स्वातंत्र्याच्या चार वर्षांनंतर भारताने यंदा पहिल्यांदा आशियाई स्पर्धेचे आयोजन केले ज्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर राहिला होता.

3. फिनलँड येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या केडी जाधव यांनी फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकले.

4. पहिल्यांदा आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या गूल नासिकवालाने मोठ्या देशांसाठी सुवर्णपदकासह अनेक पदकं जिंकली.

5. ऑल इंग्लंड क्लब स्पर्धेत भारताच्या रामनाथन कृष्णनने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला.

6. 'फ्लाइंग शीख' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंगने 1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक हुकले. पण, त्याच्य वर्षी पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय एथलीट्समध्ये अब्दुल खालिदला पराभूत करून मिल्खाने इतिहास रचला. या विजयानंतर पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष फील्ड मार्शल अयूब खान यांनी त्यांना ‘फ्लाइंग शीख’ या उपाधीने गौरविले.

7. इंग्लंडचा संघ डिसेंबर 1961 मध्ये कसोटी मालिका खेळण्यास आला होता आणि नारी कॉन्ट्रॅक्टरच्या नेतृत्वात भारताने 2-0 अशी मालिका जिंकली.

8. भारतीय फुटबॉल संघाने 1962 एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला पराभूत करून या खेळांमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले.

9. 1967 मध्ये मन्सूर अली खान पटौदीच्या नेतृत्वात भारताने प्रथमच न्यूझीलंडमध्ये परदेशी भूमीवरील कसोटी मालिकेत 3-1 ने विजयाची चव घेतली.

10. 1975 तिसऱ्या हॉकी विश्वचषकात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-1 असे हरवून विश्वचषक ट्रॉफी जिंकली.

11. 1980 मॉस्कोमधील ऑलिम्पिकमध्ये स्पेनला 4-3 ने हरवून भारताने ऑलिम्पिकमध्ये आजवरचे अंतिम सुवर्णपदक जिंकले.

12. 1980 मध्ये प्रकाश पादुकोण बॅडमिंटनमधील सर्वात प्रसिद्ध टूर्नामेंटांपैकी एक असलेल्या ऑल इंग्लंड चॅमिनेशिपमध्ये विजेता बनले.

13. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला. यानंतर भारताला विजयासाठी 28 वर्षाची मोठी प्रतीक्षा करावी लागली.

14. पीटी उषाने 986 एशियन गेम्समध्ये ऐतिहासिक विजय नोंदविला आणि अनेक विक्रम मोडले.

15. 1987 ध्ये सुनील गावस्कर कसोटी सामन्यात 10,000 धावा करणारा पहिले क्रिकेटपटू ठरले.

16. 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये 23 वर्षीय लिअँडर पेसने कांस्यपदक जिंकले होते, हे 44 वर्षातील भारतातील पहिले एकेरी पदक आहे.

17. बुद्धिबळ किंग विश्वनाथन आनंदने 2000 मध्ये जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकली.

18. 2003 मध्ये सानिया मिर्झा विम्बल्डनची दुहेरी करंडक जिंकणारी पहिली भारतीय ठरली.

19. 2006 मध्ये परिमर्जन नेगी आंतरराष्ट्रीय चेस ग्रँडमास्टर होणारी सर्वात कमी आशियाई ठरली.

20. 2007 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजित पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात भारताचे पाकिस्तानवर थरारक विजय नोंदवला.

21. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते.

22. 2012 लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी सायन नेहवाल पहिली भारतीय ठरली. तिने कांस्य पदकाची कमाई केली.

23. 2015 मध्ये सानिया मिर्झा (टेनिस) आणि सायना नेहवाल (बॅडमिंटन) यांनी आपापल्या खेळात अव्वल मानांकन मिळवले.

24. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय ठरली. सायना नेहवालने 2015 आणि 2017 मध्ये महिला एकेरीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले.

जवळपास 1.3 अब्ज लोकसंख्या असलेला जगातील दुसऱ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांत भारत अनेक बदलांमधून गेला आहे, राजकीय क्षेत्रापासून ते क्रीडा जीवनापर्यंत भारतीयांनी त्यांच्या जीवनात मोठे बदल पाहिले आहेत. आज खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात भारताची एक मजबूत देश म्हणून ओळख निर्माण केली आहे.