Independence Day 2020: भारताच्या विषयी 'या' गोष्टी अगदी मोजक्या लोकांंना आहेत ठाउक, स्वातंत्र्य दिनी तपासुन पाहा तुमचंं ज्ञान
Image For Representation (Photo Credits-Pixabay)

Unknown Facts About India : यंंदा कोरोनाच्या संंकटकाळातही स्वातंत्र्य दिनासाठीचा उत्साह कमी झालेला नाही, दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट रोजी पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  हे लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करणार आहेत. यंंदा प्रथमच आत्मनिर्भर या थीमनुसार स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन होणार आहे. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असे दिवस म्हंंटले की, प्रत्येकाच्याच देशप्रेमाला उधाण येते, पण नुसताच अभिमान किंंवा केवळ शाब्दिक प्रेम काही फायद्याचे नाही, तुम्हा आम्हाला देशाविषयी किती माहिती आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. भारताने आजवर अनेक क्षेत्रात यश प्राप्त केले आहे मात्र दुर्दैवाने अजुनही आपल्या देशाची ओळख केवळ होळी, रंग, गरिबी, गारुडी एवढीच आहे, त्याहुन वाईट हे की अशा मंंडळींना आपल्या देशाविषयी माहिती देताना आपलेच ज्ञान कमी पडते, असं पुन्हा होउ नये यासाठी आज स्वातंंत्र्य दिनाच्या निमित्तानेच आपण भारताविषयी काही न ऐकलेल्या फार जणांंना ज्ञात नसलेल्या गोष्टी जाणुन घेणार आहोत.

जवाहरलाल नेहरू यांंनी A Tryst With Destiny भाषणाने केली होती स्वातंत्र्याची घोषणा, पाहा 'तो' सुवर्ण क्षण (Watch Video)

भारताविषयी न ऐकलेल्या गोष्टी

- भारताचे राष्ट्रगीत म्हणजेच जन-गण-मन मध्ये एकुण पाच कडवी आहेत, मात्र त्यातील केवळ पहिल्या कडव्याला राष्ट्रगीत म्हणुन मान मिळाला आहे.

- जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्कृतींपैकी हडप्पा-मोहनजोदड़ो देखील याच सिंधू नदीच्या खो-यात विकसित झाली. या लोकांना ग्रीक लोकांनी इंडोई असे नाव दिले. म्हणून या संस्कृतीला इंडस सिव्हिलायजेशन असे संबोधले जाऊ लागेल. त्यातूनच पुढे 'India' हा शब्द उदयाला आला. संस्कृत भाषेमध्ये आपला भारत देशाचा उल्लेख भारतीय गणराज्य म्हणून केला जातो.

- भारताचा राष्ट्रध्वज सर्वात पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी नव्हे तर 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकत्त्यामधील पारसी बागान स्क्वेअर मध्ये फडकावला गेला. पिंगली वेंकैया यांनी तिरंग्याचे डिझाईन केले होते.

- देशात होणारा कुंभमेळा हा खास असतो, 2011 मध्ये 75 दशलक्ष यात्रेकरू कुंंभ ला आले होते. हा सर्वात मोठा जमाव अंतराळातून दिसून येत होता.

- भारतामध्ये 1 लाख 55,015 टपाल कार्यालये असलेले जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. श्रीनगरमधील दाल तलावात तरंगते पोस्ट ऑफिस आहे.

- मेघालयातील खासी टेकड्यांवरील मावसिनराम या गावात जगात सर्वाधिक नोंद झालेला सरासरी पाऊस पडतो. चेरापुंजी सुद्धा इथुनच जवळ आहे.

- मुंंबईच्या वांद्रे वरळी सीलिंककडे पृथ्वीच्या परिघाप्रमाणेच स्टीलच्या तारा आहेत हे पूर्ण होण्यासाठी एकूण 2,57,00,000 मनुष्य तास लागले असुन 50,000 आफ्रिकन हत्तीं इतके वजन आहे.

- 1893 मध्ये बांधले गेलेले 2,444 मीटर उंचीवर, हिमाचल प्रदेशातील चाईल येथील चाईल क्रिकेट मैदान जगातील सर्वात उंच आहे.

- आतापर्यंत झालेल्या सर्व 5 पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजय मिळविला असून या स्पर्धांमध्ये अपराजित राहिले आहेत. आजपर्यंत झालेल्या सर्व कबड्डी विश्वचषकात भारतीय महिला संघानेही विजय मिळविला आहे.

- सप्टेंबर 2009 मध्ये, भारताच्या इस्रो चंद्रयान -1 मध्ये मून मिनरलॉजी मॅपरचा वापर करून चंद्रावर प्रथमच पाणी शोधले आहे. 2014 मध्ये मंंगळाच्या कक्षेत जाणारा सुद्धा भारत पहिलाच देश आहे.

- इंंग्रजी चा वापर करणारी दुसर्‍या क्रमांंकाची लोकसंंख्या भारतात आहे.

- सुरुवातीला कृष्णा नदी डेल्टाच्या गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यात हिरे सापडले. ब्राझीलमध्ये हिरे सापडे पर्यंत भारताने हिरा उत्पादनात जगाचे नेतृत्व केले.

-शैम्पूचा शोध भारतात तयार करण्यात आला, व्यावसायिक द्रव नसून औषधी वनस्पतींचा वापर करण्याच्या पद्धतीने. 'शैम्पू' हा शब्द स्वतः चंपू या संस्कृत शब्दातून आला आहे.

-भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक APJ अब्दुल कलाम हे 2006 मध्ये स्वित्झर्लंडला गेले होते. त्यांचे आगमन झाल्यानंतर स्वित्झर्लंडने 26 मे रोजी विज्ञान दिन म्हणून घोषित केले.

Indian Independence Act, 1947 ब्रिटीशांनी मंजुर केल्यानंतर भारतामध्ये लोकशाहीला सुरूवात झाली. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. प्रसंगी बलिदान देऊन, चळवळ, मोर्चे, सत्याग्रह नानाप्रकारे मिळवलेल्या या स्वातंंत्र्याच्या समस्त देशवासियांंनी कोट्यावधी शुभेच्छा!