Jawaharlal Nehru A Tryst With Destiny Speech (Photo Credits: Youtube)

Indian Independence Day 2020: "मध्यरात्री 12 च्या ठोक्याला जेव्हा जग झोपी गेलंय तेव्हा भारत जागा होणार आहे, एका नव्या प्रकाशात भारत नवा जन्म घेणार आहे", स्वातंंत्र्याच्या 73 वर्षानंंतरही हे शब्द कानावर पडताच कोणताही देश प्रेमी नागरिक भारावुन जाईल. 15 ऑगस्ट 1947 जेव्हा भारताने तब्बल 150 वर्षांंच्या ब्रिटिशांंच्या गुलामगिरीतुन स्वतःची सुटका करुन घेतली होती तेव्हा देशाची पहिले पंंतप्रधान जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांंनी याच शब्दांंसहित स्वातंंत्र्याची घोषणा केली होती. स्वतंत्र भारताचे पहिले पंंतप्रधान म्हणुन संंसदेत भाषण करताना 'A Tryst With Destiny' या भाषणातुन नेहरुंंनी कोट्यावधी भारतीयांची मनंं जिंंकुन घेतली होती. उद्या आपण देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत यानिमित्ताने नेहरुंंच्या या भाषणाचा आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षणाचा पुन्हा अनुभव घेउयात.

भारताचा यंदा 74 वा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या या दिवसाचंं महत्त्व आणि थीम

जवाहरलाल नेहरु यांनी A Tryst With Destiny या भाषणाची सुरुवात करताना म्हंटले होते की, अनेक वर्षांपुर्वी आपण नियतीशी करार केला होता, आणि आता वचनपुर्तीचा क्षण आहे. आज मध्यरात्रीच्या ठोक्याला आपण एक नवा जन्म घेत आहोत.अनेक दशकांंचे कष्ट मागे टाकत आहोत. नव्या संंधी आपली वाट पाहत आहेत, आपल्या बुद्धीमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपुर वापर करुन आपल्याला कोट्यावधी भारतीयांची सेवा करायची आहे. यासोबतच नेहरु व त्यांच्या मंंत्रिमंंडळाने शपथ घेतली होती.

जवाहरलाल नेहरु स्वातंंत्र्य दिन भाषण 'A Tryst With Destiny'

दरम्यान, भारतामध्ये यंदाही 15 ऑगस्टच्या सकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे हा सोहळा सार्वजनिकरित्या साजरा करण्यापेक्षा व्हर्च्युअल स्वरूपात साजरा केला जाणार आहे.