
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 12 सप्टेंबर रोजी महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सर्वत्र होऊ लागली. विराटच्या ट्विटवरून अफवा पसरल्या की धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करणार आहे. मात्र, धोनीची पत्नी साक्षी आणि मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी अफवा म्हणून हे वृत्त नाकारले. याबाबत आता कोहलीनेही आपले स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की मी हा फोटो असाच शेअर केला आहे. मला माहित नाही की एखाद्या फोटोमुळे अशा अफवा पसरू शकतात. (एमएस धोनी आज संध्याकाळी करणार निवृत्तीची घोषणा, विराट कोहली याने शेअर केलेल्या 'या' फोटोनंतर सोशल मीडियात अफवा)
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टी-20 मॅचपूर्वी पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला, "धोनीचा फोटो शेअर करताना माझ्या मनात काही नव्हते. मी घरी बसून तो फोटो शेअर केला. त्याची बातमी बनली. माझ्यासाठी हा एक मोठा धडा आहे. मी जसा विचार करतो तसं जग विचार करत नाही. मला फक्त एक फोटो शेअर करायचा होता. लोकांनी हे प्रकरण पूर्णपणे वेगळं केलं. हे मुळीच खरे नाही."
View this post on Instagram
For everyone who were asking about the MS Dhoni-VK picture on the Skip's Insta feed 😁😁👌🏻#TeamIndia
विश्वचषक 2019 पासून धोनीच्या निवृत्तीची बातमी जोरात सुरू आहे. अनेकांचा विश्वास होता की धोनीने आता निवृत्ती घ्यावी, असे एका विभागात असे म्हटले आहे की पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकपर्यंत त्याने खेळावे. कोहलीने गुरुवारी शेअर केलेल्या फोटोनंतर धोनीच्या निवृत्तीची बातमी अधिक तीव्र झाली. धोनीबरोबर 2016 र्ल्ड टी-20 चा फोटो कोहलीने शेअर केला होता. कोहलीने लिहिले, "एक सामना जो मी कधीही विसरू शकत नाही. विशेष रात्र. या माणसाने मला फिटनेस टेस्टसारखे धावण्यास भाग पाडले." धोनीने नुकतेच वेस्ट इंडिज (West Indies) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यातून माघार घेतली आहे. तो म्हणाला होता की, त्याला भारतीय सैन्यासोबत काही महिने सराव कराचा आहे, त्यासाठी दोन महिन्यांचा अवधी घेतला आहे.