[Poll ID="null" title="undefined"]टीम इंडियाचा यष्टिरक्षक आणि भारत वर्ल्ड टी-20 आणि विश्वचषक जिंकणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आता क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. आम्ही हा दावा करीत नाही पण ही बातमी सोशल मीडियावर जोर धरत आहे. आणि याचे कारण म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शेअर केलेला 'हा' फोटो. आज संध्याकाळी एमएस धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतात अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सोशल मीडियावर लोक असे ट्विट करीत आहेत की धोनी आज निवृत्त होण्याची घोषणा करण्यासाठी सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेऊ शकतो. मागील अनेक महिने धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु होत्या. आधी धोनी विश्वचषकनंतर निवृत्त होणार असे बोलले जात होते, पण नंतर धोनी विश्वचषकनंतर निवृत्त होईल असे सुरु होते. पण, सर्व काही अफवा निघाल्या. (विराट कोहली याने शेअर केला पत्नी अनुष्का शर्मा सोबतचा Hot फोटो, चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया)
कोहलीच्या ट्विटनंतर धोनीच्या निवृत्तीची बातमी सोशल मीडियावर पसरली. कोहलीने गुरुवारी आपल्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला, यात तो धोनीला प्रणाम करीत आहे. त्याने लिहिले की, "मी हा सामना कधीही विसरणार नाही. विशेष रात्र या व्यक्तीने मला फिटनेस टेस्टसारखे चालविले." कोहलीने केलेल्या या ट्वीटनंतर चाहत्यांना असे वाटते की धोनी आज निवृत्तीची घोषणा करू शकतो कारण भारतीय कर्णधाराने ज्या मॅचचे चित्र लावले आहे तो सामना आज खेळला गेला नव्हता. तसंच धोनीने आजही असं काही केलं नाही ज्यामुळे विराटला त्याची आठवण आली. पहा ट्विटरवर चाहत्यांनी कशा दिल्या प्रतिक्रिया:
A game I can never forget. Special night. This man, made me run like in a fitness test 😄 @msdhoni 🇮🇳 pic.twitter.com/pzkr5zn4pG
— Virat Kohli (@imVkohli) September 12, 2019
धोनीने विराटला फोन केला होता का?
MS Dhoni announced retirement I guess personally to Kohli on phone.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2019
आज संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषदेत धोनी निवृत्तीची घोषणा करणार का?
#Dhoni Today Press conference regarding Dhoni... Tonight 7.00pm... pic.twitter.com/im2fe0YA8M
— Mubarak S (@mubarakvip07) September 12, 2019
एमएसडीच्या निवृत्तीच्या बातमीनंतर प्रतिक्रिया
When someone spread negativity about Msdhoni's Retirement
Msdians:#Dhoni pic.twitter.com/DGGndQjy3P
— MeMe_वाला (@black_snake10) September 12, 2019
दरम्यान, इतिहास साक्षी आहे की धोनी त्याचे मोठे निर्णय अचानक घेतो आणि जगाला धक्का बसतो. 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यानच धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर, 2017 मध्ये, धोनीने मर्यादित षटकांच्या स्वरूपाच्या संघाचे कर्णधारपद सोडला. इंग्लंड दौर्यापूर्वी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर विराटने संघाची धुरा आपल्या हाती घेतली.