भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोबत वेळ घालवण्याचा एकही संधी सोडत नाही. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अनुष्का विराटला भेटायला येते. दोघे नुकतेच सुट्टीवरून देशात परतले आहे. विराट आणि अनुष्काला चाहत्यांनी नुकतंच वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्या दरम्यान सोबत पाहिलं होतं. विंडीजविरुद्ध मॅचमधून थोडा वेळ काढत दोघे बीच किंवा मॉलमध्ये एकमेकांसोबत वेळ व्यतीत करत दिसायचे. विंडीज दौऱ्यादरम्यान, दोघांचा बीचवरील फोटो देखील सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय बनला होता. एका फोटोत विराट शर्टलेस दिसत आहे तर अनुष्कादेखील मागे राहिली नाही. तिने देखील बिकिनी घालून बीचवर असण्याचा आनंद लुटला. (OMG! विराट कोहली याच्या रोलेक्स डेटोना रेनबो वॉचची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल)
याच दरम्यान, विराटने त्याच्या हॉलिडेवरील एक फोटो नुकताच शेअर केला आहे. यात दोघांची हॉट केमिस्ट्री दिसून येत आहे. वेस्ट इंडिज दौर्यादरम्यान कोहली आणि अनुष्काचा हा फोटो दिसत आहे. दोघेही बीचवर रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत. एकीकडे कोहली शिर्टलस आहे तर अनुष्काने ही बिकिनी परिधान केली आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काच्या मांडीवर डोकं ठेऊन सेल्फी घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना विराटने कॅप्शनमध्ये दोन हार्ट इमोजी घातले आहेत. विराट-अनुष्काच्या या रोमँटिक फोटोला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. पहा फोटो:
विंडीजला तिन्ही मालिके व्हाईट-वॉश केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि टेस्ट मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन्ही संघातील सामन्याला टी-20 पासून सुरुवात होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील पहिला टी-20 सामना धर्मशाळामध्ये 15 सप्टेंबर रोजी खेळाला जाईल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर कोहली स्टँडचे अनावरण होईल, त्यानंतर टीम इंडिया धर्मशाला रवाना होईल.