बॉलीवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांची लाइफ स्टाईल त्यांच्या फॅन्स आणि चाहत्यांना आकर्षित करते. लक्झरी घरे, परदेशात सुट्या, स्टाईलिश कपडे आणि त्यांचे महागड्या वस्तू या सर्वांवर त्यांची नजर असते. आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या एका लक्झरी घड्याळामुळे चर्चेत आला आहे. या घड्याळाची किंमत बाहेर आली आहे, हे जाणून तुम्हीदेखील थक्क व्हाल. विराटने सोशल मीडिया वर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या डाव्या हातातील टॅटू आणि घड्याळ मिरवत आहे. कोहली हा जगातील सर्वात आवडता अतिशय स्टाईलिश क्रिकेटपटू आहे. मग त्याचा सूट असो, शेड्सचे कलेक्शन किंवा घड्याळांचा स्टॅक असो, विराटबद्दल प्रत्येक गोष्ट त्याला स्टाईलिश बनवते. (विराट कोहली पाकिस्तानी संघात, पाकचा नापाक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, भारतीय चाहत्यांकडून सडेतोड प्रत्युत्तर)
आणि सध्या विराट त्याचे पसंतीचे रोलेक्स वॉच घालवून मिरवताना दिसतोय. विराटने परिधान केलेले घड्याळ, रोलेक्स डेटोना रेनबो वॉच आहे. या घड्याळात एक कायम केस, स्क्रू-डाऊन स्टील बॅक, ज्याला हिरे जडलेले आहेत. स्क्रू-डाऊन मुकुट आणि ट्रिपलॉक ट्रिपल वॉटरप्रूफनेससह पुश बटण, इंद्रधनुष्य पदवीच्या 36 बॅगेट-कट नीलमणीसह निश्चित 18 के पिवळ्या सोन्याचे बीझल सेट, स्क्रॅच-प्रतिरोधक नीलम क्रिस्टल, ब्लॅक डायल आणि 11 बॅगेट-कट इंद्रधनुष्य रंगीत नीलम अवर मार्कर. आणि अखेरीस येते ते म्हणजे या घड्याळाची किंमत. 100 मीटर जलरोधक असलेल्या घड्याळाची किंमत साधारण 70 लाख इतकी आहे. होय, तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. हे घड्याळ सर्वसामान्य माणसाला जरी परवडणारं नसलं तरी कोहलीला नक्कीच परवडेल!
दरम्यान, टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा आता संपला आहे. आणि त्यानंतर 15 सप्टेंबरपासून त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका संघाशी होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील सामना टीम इंडिया घरच्या मैदानावरच खेळेल. याची सुरुवात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेने होईल. दोन्ही संघात 3 सामन्यांची टी-20 आणि टेस्ट मालिका खेळली जाईल.