Virat Kohli Viral Video: पाकिस्तान डिफेंस डे (Pakistan Defence Day) निमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पाकिस्तान क्रिकेट संघाचा घटक झल्याचे कल्पनाशक्तीच्या जोरावर दाखविण्यात आले आहे. सोशल मीडियाव व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. काही चाहत्यांनी या व्हिडिओवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तर, काही चाहत्यांनी सौम्य शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्तानी पत्रकार नाइला इनायत यांनीही हा व्हिडओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार नाइला इनायत यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत म्हटले आहे की, 'पाकिस्तानची क्रिकेट टीम श्रीनगरमध्ये खेळत आहे. विराट कोहली पाकिस्तानसाठी खेळत आहेत. ही केवळ रेग्युलर डिल्यूजन आहे. बाकी काही नाही.' दरम्यान, व्हिडिओत कल्पना करण्यात आली आहे की, सन 2025 हे वर्ष सुरु आहे. श्रीनगर क्रिकेट स्टेडीयमवर टी-20 विश्वचषक स्पर्थेतील अंतिम सामना खेळला जात आहे आणि पाकिस्तानकडे दोन दिग्गज सलामीविर आहेत. एक विराट कोहली आणि दुसरा बाबर आजम.
नायला इनायत ट्विट
Pakistan cricket team playing in Srinagar, Virat Kohli playing for Pakistan. Just some regular delusions, nothing else. pic.twitter.com/swBnUp3ShM
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) September 4, 2019
"aaj kohli jitvayega". Even little kids of 2025 know not to rely on babar.
— anita verghese (@anita76962940) September 4, 2019
Dear Pakistaniyo pic.twitter.com/KjcnZFGoUU
— Yogita🦋 (@momo_classygirl) September 4, 2019
— kkrishna (@upai_nai) September 4, 2019
व्हिडिओत पुढे दाखवण्यात आले आहे की, हा सामना एक कुटुंब टीव्हीवर पाहात आहे. सामन्यादरम्यान, एक मुलगी बोलते की, विराट कोहली हा सामना जिंकून देईल. यावर तिथे असलेला एक व्यक्ती म्हणतो की, विराट कोहील पहिल्यांदा भारताच्या संघात होता. यावर ती मुलगी म्हणते की, कोण भारत (व्हाट्स इंडिया) ? यावर तो व्यक्ती स्मितहास्य करतो. या व्हिडिओवर सोशल मीडियातून प्रचंड प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाकिस्तान 6 डिसेंबर डिफेन्स डे म्हणून साजरा करतो. याच दिवसाचे निमित्त साधत पाकिस्तनने हा व्हिडिओ तयार केला आहे. (हेही वाचा, पॅलेट गनपीडित तरुण म्हणून पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी Retweet केला पॉर्न स्टार Johnny Sins याचा फोटो)
— kkrishna (@upai_nai) September 4, 2019
भारताच्या प्रगतीत खोडा घालण्यासाठी पाकिस्तान नेहमी प्रयत्न करत आला आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तानची नापाक चाल भारताने उधळून लावली आहे. त्यामुळे अनेकदा पाकिस्तानने दहशतवादाची मदत घेतली आहे. परंतू, भारताने पाकला सडोतोड उत्तरच दिले आहे. त्यात भारताने पुलवामा हल्ल्यानंतर राबवेलेली पाकिस्तानविरोधातील आंतरराष्ट्रीय कूटनिती, तसेच जम्मू काश्मीर मधून हटवलेले 370 कलम आदींमुळे आगोदरच सैरभैर झालेला पाकिस्तान अधिकच गळपटला आहे.