Teacher's Day 2020 Special: क्रिकेटमधील 'ते' गुरु ज्यामुळे टीम इंडिया बनली सुपर पॉवर, गुरु-शिष्यांच्या 'या' जोड्या आजही करतात प्रेरित
सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर (Photo Credit: Instagram)

Teacher's Day 2020: भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teacher's Day) साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांचा वाढदिवस आहे ज्यांनी शिक्षकांचे महत्त्व सांगून आपला वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे महत्त्व खूप असते. क्रिकेटच्या जगातही गुरु आणि शिष्यांच्या अशा जोड्या आहेत ज्यांच्याकडे पाहिल्यावर आजही आपणास प्रेरणा मिळते. क्रिकेटमधील या गुरुजींनी भारतात सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या खेळाला आजवरचे सर्वोत्तम हिरे मिळवून दिले आहेत. त्यांच्या शिक्षणामुळेच आज टीम इंडिया (Team Indai) क्रिकेट विश्वात सुपर पॉवर बनली आहे. भारतीय खेळाडूंचे 'क्रिकेटचा देव', 'रन-मशीन', 'हिटमॅन' म्हणून कौतुक केले जाते. टीम इंडियाच्या या खेळाडूंमागे त्यांच्या गुरूंचे अथक परिश्रम आहे.  (Teachers’ Day 2020 Virtual Celebration Ideas: कोरोनाच्या सावटाखाली यंदा शिक्षक दिन सुरक्षित साजरा करण्यासाठी ऑनलाईन सेलिब्रेशनचे काही हटके पर्याय!)

गुरूमुळे शिष्याचे आणि शिष्यामुळे गुरूंचे नाव होते हे म्हणतात ते खरे. आज शिक्षक दीनानिमित्त आपण क्रिकेटमधील अशा काही गुरु-शिष्यच्या जोडींबद्दल जाणून घेणार आहोत, जे आजही अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत.

1. सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात आज जे एवढे यश, कीर्ती कामवाली आहे त्यात त्याचे गुरू रमाकांत आचरेकर यामागील मोठे कारण आहे. सर्वप्रथम आचरेकर यांनी सचिनची प्रतिभा ओळखली होती. बालपणात जेव्हा सचिन नेटमध्ये फलंदाजी करून टाकायचा तेव्हा आचरेकर सर स्टंपवर एक नाणे ठेवायचे आणि जो सचिनला आऊट कराचा त्याला ते नाणे मिळायचे. सचिनऐवजी आचरेकरांनी विनोद कांबळी, प्रवीण अमरे, अजित आगरकर, समीर डिग्गे आणि बलविंदर सिंह संधूसारख्या क्रिकेटपटूंनाही प्रशिक्षक दिले आहेत.

2. विराट कोहली - राजकुमार शर्मा

विराटच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी युवा विराटच्या जीवनात मोठी भूमिका बजावली. विराटच्या प्रतिभेला उत्तम प्रकारे साजवण्याची शर्मा यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली. विराटने लवकरच भारतीय संघात स्वत:साठी स्थान मिळवले आणि आज तो तिन्ही स्वरूपात तो देशाचे नेतृत्व करत आहे. 2014 मध्ये, शिक्षक दिनानिमित्त चॅम्पियन फलंदाजाने त्याच्या प्रशिक्षकास स्कोडा रॅपिड भेट म्हणून दिली. कोहलीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजकुमार यांना 2016 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

3. एमएस धोनी - केशव बॅनर्जी

धोनीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनीच त्यांना फुटबॉलच्या मैदानाबाहेर क्रिकेट विश्वात आणले. लहान महेंद्र सिंह धोनीला फुटबॉलमध्ये खूप रस होता. गोलकीपर म्हणून त्याच्या कामगिरीने शालेय क्रीडा शिक्षक केशव बॅनर्जी इतके प्रभावित झाले की त्यांनी धोनीला क्रिकेट टीममध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळण्यास सांगितले. इथूनच धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यावेळी धोनीमध्ये क्रिकेटला एक नवीन नायक सापडला आणि तो आजवरचा एक महान विकेटकीपर बनला.

4. युवराज सिंह-योगराज सिंह

अंडर-19 पासूनच युवराज स्टार क्रिकेटर मानला जात होता. त्याचे वडील आणि प्रशिक्षक योगराज सिंह यामागील सर्वात मोठे कारण होते. योगराज यांनी त्याला लहानपणापासूनच कठोर प्रशिक्षण दिले ज्यामुळे युवराज त्यांना ड्रॅगन म्हणतो. युवराजला स्केटिंगची आवडायची पण, त्याच्या वडिलांनी त्याला इतर कोणताही खेळ खेळू दिला नाही. योगराज स्वत: भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले आणि ते पंजाबी चित्रपटांचेही हिरो होते. पण अलीकडच्या काही वर्षांत त्यांच्या उग्र वागणूकीची जास्त चर्चापाहायला मिळते.

5. अजिंक्य रहाणे-प्रवीण अमरे

रहाणेचे प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आजही जेव्हा जेव्हा रहाणे खराब फॉर्मवर निशाणा साधला जातो तेव्हा अमरे नेहमीच त्याचा बचाव करण्यासाठी पुढे येतात. ते मुंबईचे असून मुंबईसह रेल्वे, राजस्थान आणि बंगालकडून घरगुती क्रिकेटमध्ये खेळले आहेत. रमाकांत आचरेकर यांच्याकडूनही त्यांनी क्रिकेटच्या गुण शिकले आहेत.

भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती 5 सप्टेंबर रोजी येते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 27 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले. त्यांनी आयुष्यातली 40 वर्ष शिक्षक म्हणून घालवली. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.