Happy Teachers Day 2019 (Photo Credits: File Image)

भरतामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers’ Day) म्हणून साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती राधाकृष्ण सर्वपल्ली (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीच्या औचित्याने शिक्षक दिन साजरा करण्याची पद्धत रूढ झाली आहे. 1962 साल पासून भारतामध्ये त्यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा करत ज्ञान देणार्‍या प्रत्येक व्यक्तींप्रति आदरभाव व्यक्त करण्याची प्रथा सुरू झाली अअहे. किमान या दिवसाचं औचित्य साधून जुन्या शिक्षकांना भेटण्याची, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. यंदा जगभरात कोरोनाचं सावट असल्याने बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. प्रामुख्याने 60 वर्षाच्या पार गेलेल्यांना या काळात विशेष जपण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आले आहे. मग अशा परिस्थितीमध्येही शिक्षकांसोबत दरवर्षीप्रमाणे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी तुम्हांला काही शक्कल लढवत डिजिटल माध्यमात यंदाच्या टिचर्स डे चं व्हर्च्युअल सेलिब्रेशन करावं लागणार आहे. यासाठी पहा कोणकोणत्या पर्यायांचा वापर करत तुमच्या वर्गमित्रांसोबत शिक्षकांसाठी यंदाचा टिचर्स डे स्पेशल करू शकता.

झूम मिटिंग ते व्हिडिओ मेसेज, ऑनलाईन सेलिब्रेशन ते ई गिफ्ट असे यंदा अनोखे मार्ग वापरून शिक्षकांसोबत तुम्हांला टिचर्स डे चं सेलिब्रेशन करावं लागणार आहे. Teachers’ Day 2020 Date: भारतात कधी साजरा केला जातो शिक्षक दिन? जाणून घ्या शिक्षकांना समर्पित केलेल्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

व्हिडिओ कॉल

झूम मिटिंग, गूगल मीट असे पर्याय वापरून तुम्ही यंदा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शिक्षकांना सरप्राईज करू शकता. त्यांना अचानक कॉलचं इंव्हिटेशन पाठवून त्यांच्या शिष्यांसोबत ऑनलाईन जोडू शकता.

ई गिफ्ट

आजकाल फुलं असोत किंवा गिफ्ट्स तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ती कधीही कुठेही पाठवू शकता. यंदा ई कार्ड्स व्हाऊचर्स पाठवूनही तुम्ही स्वतःला आणि शिक्षकांना सुरक्षित ठेवून सेलिब्रेशन करू शकता.

व्हिडिओ मेसेज

तुमच्या शिक्षकांप्रति असणार्‍या भावना मनमोकळे पणाने व्यक्त करण्यासाठी यावर्षी तुम्ही भेटू शकत नसलात तरीही त्या ऑनलाईन व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून नक्की पाठवू शकता.

गिफ्ट्स

एखादी वस्तू ऑनलाईन बूक करूनच थेट तुमच्या शिक्षकांच्या पत्यावर त्याची डिलेव्हरी करा. यामुळे तुमच्या धोका आणि वेळ दोन्ही वाचेल.

आज 21 व्या शतकामध्येही गुरू-शिष्य परंपरा जपणार्‍या भारतीय समाजामध्ये शिक्षक म्हणजे गुरूला दैवताचं स्थान दिलं जातं. त्यामुळे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरू पौर्णिमा हा दिवस अनेकांसाठी खास असतो. गुरू पौर्णिमे इतकंच महत्त्व शालेय जीवनापासून आपल्यावर विविध टप्प्यांत संस्कार करणार्‍या शिक्षक रूपी व्यक्तींचे असते. त्यामुळे अभार मानण्यासाठी शिक्षक दिन खास असतो.