
ICC Player of the Month: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी करत दुसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 किताब पटकवला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिलचे नावही होते. अंतिम सामन्यानंतर, गिलला आयसीसीने एक मोठा पुरस्कार दिला आहे. आयसीसीने त्याला फेब्रुवारी महिन्यासाठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब दिला आहे. गिलने फेब्रुवारीमध्ये शानदार कामगिरी केली होती. म्हणून गिल यांना फेब्रुवारी महिन्यासाठी नामांकन देण्यात आले.
गिलची स्पर्धेत शानदार कामगिरी
त्याच्याशिवाय, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स यांनाही फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळाले होते. पण गिलने स्मिथ आणि फिलिप्सला मागे टाकत आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला. फेब्रुवारीमध्ये गिलने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 101.50 च्या सरासरीने 409 धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने सलग तीन अर्धशतकेही झळकावली. याशिवाय, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले.
हे देखील वाचा: ICC ODI Batter Ranking: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आयसीसी रँकिंगमध्येही चमकला, घेतली मोठी झेप; तर कोहली 'या' स्थानावर
शुभमन गिलची शानदार कारकीर्द
आतापर्यंत शुभमन गिलने भारतासाठी 32 कसोटी सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने 1893 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 59.04 च्या सरासरीने 2775 धावा केल्या आहेत. 21 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. गिलने एकदिवसीय सामन्यात 5 शतके आणि एकदिवसीय सामन्यात 8 शतके केली आहेत आणि टी-20 मध्येही 1 शतक ठोकले आहे.