New ICC Rules: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल; महत्वाच्या 'या' 4 नियमांना मंजूरी

जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बीसीसीसीआयसह बहुतांश क्रिकेट बोर्डांना देखील बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने गेल्या 2-3 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने (International Cricket Council) खेळाडूंना सराव करण्यासाठी नियमावली आखून दिली आहे. महत्वाचे म्हणजे, सामन्या दरम्यान गोलंदाज चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करतात. यावर बंदी घालण्यात यावी, अशी शिफारीस अनिल कुंबले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीकडे केली होती. कोरोना विषाणूच्या संकटात खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि त्यांना आज मंजूरी देखील मिळाली आहे.

कोरोनानंतर क्रिकेट सुरु करायचे झाल्यास खबरदारीचे उपाय घ्यावे लागणार आहे. कारण कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपण ठप्प झाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा झालेली नाही. आता करोना विषाणूचा जोर थोडा कमी झाल्याचे पाहून पुन्हा एकदा क्रिकेट पूर्वपदावर येण्यासाठी सज्ज होत आहे. पण जर यावेळी सुरक्षिततेचे उपाय घेतले गेले नाहीत, तर क्रिकेट पुन्हा बंद करावे लागू शकते. यामुळे आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्वाचे 4 बदल करण्यात येणार आहेत. हे देखील वाचा- शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान वनडे क्रिकेटमधील 10 सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची केली निवड; विराट कोहली-रोहित शर्मा Out

 

आयसीसीने नेमके काय बदल केले आहेत?

- कसोटी सामना खेळत असताना एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याच्या जागी संघाला दुसऱ्या खेळाडूला खेळवता येणार आहे. हा नियम एकदिवसीय सामना किंवा टि-20 क्रिकेटमध्ये लागू होणार नाही.

- चेंडु चमकवण्यासाठी गोलंदाज थुंकी किंवा घामाचा वापर करतात. यावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास खेळाडूला दोनदा इशारा दिला जाईल. त्यानंतर संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. ज्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 अतिरिक्त धावा मिळणार आहे.

- कोरोना विषाणूमुळे स्थानिक पंचाची निवड केली जाणार आहे.

- सामना दरम्यान दोन्ही संघाला अतिरिक्त डीआरएस देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी 3 तर, एकदिवसीय सामन्यात दोन डीआरएस घेता येणार आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कित्येकांना अनेक अडचणींच्या सामोरे जावा लागत आहे. सध्या काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समजत आहेत. ज्यामुळे तेथील नागरिकांनाच्या समस्यांमध्ये घट झाली आहे.