भारत (India) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) शत्रुत्व बरीच जुनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन देशांमधील द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध गेल्या काही काळापासून खराब झाले आहेत. दोन्ही संघांमधील अखेरची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळली गेली होती, जेव्हा पाकिस्तानने दोन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांसाठी भारत दौऱ्यासाठी आला होता. शिवाय, दोन्ही देशांच्या क्रिकेट टीममध्ये अखेरचा कसोटी सामना 2007 मध्ये भारतात खेळला गेला होता. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने भारत-पाकिस्तानसह दहा-आंतरराष्ट्रीय वनडे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची यादी निवडली आहे. अख्तरच्या या यादीमध्ये विराट कोहली (Virat Kohli) किंवा रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघेही नाहीत. अख्तर ज्या सर्व क्रिकेटपटूंसोबत खेळला आहे त्यांची निवड केली आहे. या यादीमध्ये त्याने सध्याच्या कोणत्याही क्रिकेटपटूचा समावेश अख्तरने केलेला नाही. (अनफिट म्हणून नव्हेतर माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावून मला संघाबाहेर केले; शोएब अख्तर यांचा गौप्यस्फोट)
हलो अॅपवर लाइव्ह चॅट दरम्यान अख्तरने भारत आणि पाकिस्तानमधील एकत्रित दहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटरची नावे निवडली. या यादीत फक्त तीन गोलंदाज आहेत तर अब्दुल रझाक आणि युवराज सिंहची अष्टपैलू म्हणून निवड झाली आहे. या यादीमध्ये अख्तरने चार भारतीय क्रिकेटपटूंची निवड केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत सामील होणे जवळजवळ निश्चित होते, कारण त्याने अख्तरविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली आहे. यानंतर अख्तरने राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागलाही या 10 खेळाडूंच्या विशेष यादीत समाविष्ट केले आहे. युवराज चौथा भारतीय आहे. पाकिस्तानकडून अख्तरने सईद अन्वर, इंझमाम-उल-हक, अब्दुल रझाक, सकलेन मुश्ताक, वसीम अक्रम आणि वकार युनूस यांची निवड केली.
अख्तरचे भारत आणि पाकिस्तानकडून पहिल्या दहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: सचिन तेंडुलकर, सईद अन्वर, इंझमाम-उल-हक, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, अब्दुल रझाक, युवराज सिंग, सकलेन मुश्ताक, वसीम अकरम, वकार युनूस.