शोएब अख्तर (Photo Credit: Getty)

2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून अनफिट आहे म्हणून नव्हेतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांनी हेलो लाईव्हच्या (Helo Live) माध्यमातून हा गौप्यस्फोट केला आहे. शोएब अख्तर यांच्या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. पाक संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे हे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले आणि मला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मी हा प्रसंग कधीच कोणत्या मीडियामध्ये प्रसिद्ध केला नाही, पण आज मी हा प्रसंग हेलोवर सांगत आहे. तसेच हे आरोप आजपर्यंत मागे घेतले गेले नाही, असेही ते म्हणाले आहेत.

हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शोएब अख्तरने आपल्या कारकिर्दीतला अनुभव लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, ते म्हणाला की, मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश माझ्या मेहनतीचे फळ आहे. मात्र, पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या मीडियातील प्रसिद्धीमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. परंतु, मला त्रास देणारे खेळाडू आज नामशेष झाले आहेत. तर, संपूर्ण क्रिकेटविश्वात आजही मला ओळखले जात आहे. तसेच भारतातही मला कधी द्वेषाला सामोरे जावे लागले नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे, असेही शोएब अख्तर म्हणाले आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा खेळाडू बाबर आजम यांच्या तुलनेबाबातही चर्चा केली आहे. विराट कोहलीला एकदिवसीय सामने मोठ्या खेळण्याची संधी मिळत आहे. तर, दुसरीकडे पाकिस्थान क्रिकेटची परिस्थिती बेताची आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध होत नाही. पाकिस्तान क्रिकेटच्या तिजोरीत खडखडाट असल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची जास्त संधी मिळत नाही. त्यामुळे विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीची आहे, असे मत शोएब अख्तर यांनी व्यक्त केले आहे. हे देखील वाचा- Renee Gracie Becomes Porn Star: V8 Supercar महिला रेसर रेनी ग्रेसी बनली पॉर्न स्टार, आठवड्याला 18.8 लाख कमाई करत असल्याचा केला दावा

याशिवाय शोएबने भारतीय संघाच्या कर्णधारांच्या कामगिरीचे कौतूक केले आहे. यापूर्वी पाकिस्तानचा संघ भारताला सहज हरवून जायचा पण सौरवने तयार केलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला अनेकवेळा पराभूत करुन स्व:ताला सिद्ध केले आहे. आज महेंद्रसिंग धोनीने संघाला नाव मिळवून दिले आहे. तर, सौरव गांगुलीने संघाचा पाया रचला आहे. त्याने भारतीय संघासाठी त्यावेळी योग्य निर्णय घेतले आहेत, असे शोएब म्हणाले आहेत.