भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, अशा प्रश्नांना धोनीने कायमचा पूर्णविराम लावला आहे. याआधीही त्याने कसोटी सामन्यातून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. धोनीच्या या निर्णायावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), भारताचे माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासह अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेट संघातील यशस्वी कर्णधारांपैकी धोनी एक आहे. धोनीने आपल्या सर्वोकृष्ट कामगिरीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपली अनोखी ओळख निर्माण केली होती.

महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 पासून मला निवृत्त समजले जावे", असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या पोस्टसोबतच धोनीने एक व्हिडीओही शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. 39 वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. हे देखील वाचा- MS Dhoni Retirement: एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, 'Thank You माही' म्हणत चाहते भावुक (See Tweets)

सचिन तेंडूलकर यांचे ट्वीट-

विरेंद्र सेहवाग यांचे ट्विट-

विराट कोहली याचे ट्विट-

हार्दीक पांड्या याचे ट्विट-

 

भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोकृष्ट कर्णधाराच्या यादीत महेंद्र सिंह धोनीचेही जोडण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखील भारतीय संघाने 2 विश्वचषक आणि एक चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघासाठी त्याने दिलेले योगदान मोलाचे आहे.