(Photo Credit: X Formerly Twitter)

Hardik Pandya Dating Jasmin Walia? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया स्टेडियममध्ये दिसली. विशेष म्हणजे, ती भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेलच्या पत्नीसोबत बसली होती, त्यानंतर हार्दिक पांड्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या अटकळ पुन्हा एकदा समोर वाढतांना दिसत आहे . जास्मिन आणि हार्दिकच्या अफेअरची चर्चा नवीन नाही. यापूर्वीही, ग्रीसमधील एकाच हॉटेलमधून दोघांनी वेगवेगळे फोटो शेअर केल्यामुळे दोघेही एकत्र असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. जरी, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही, परंतु सोशल मीडियावर ते सतत चर्चेत येत आहेत.

हार्दिक पांड्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आहे. आजकाल हार्दिक पांड्या त्याच्या क्रिकेटपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तो त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून वेगळा झाला आहे . पण त्याची कथित प्रेयसी जास्मिन वालियाशी संबंधित बातम्या सतत व्हायरल होत आहेत. सध्या हार्दिक आणि जास्मिन यांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले आहे. पण चाहत्यांना त्याच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीजमधून अनेक संकेत समोर येत आहेत. ही फक्त अफवा आहे का, की खरोखर काहीतरी विशेष घडत आहे? हे लवकरच समोर येईल.

येथे पाहा, जास्मिन वालियाचा व्हायरल फोटो 

कोण आहे जास्मिन वालिया?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश-भारतीय गायिका आहे. ती तिच्या बम डिगी या सुपरहिट गाण्यासाठी ओळखली जाते, जे तिने झॅक नाइट सोबत गायले होते. हे गाणे भारतात खूप हिट झाले आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटातही या गाण्याचा समावेश होता.