महेंद्र सिंह धोनी (Photo Credit: Getty Images)

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एमएस धोनीने (MS Dhoni retires) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची एक्झिट जाहीर केली आहे. धोनीच्या अचानक निवृत्तीचा चाहत्यांना मात्र धक्का बसला. भारतीय संघाचा (Indian Team) माजी कर्णधार आणि भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक अशी ओळख असलेला धोनी मागील वर्षी वर्ल्ड कप सेमीफायनल सामान्यानंतर क्रिकेट पीच वरून बाहेर आहे. धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी अवघ्या काही मिनिटात सर्वत्र पसरली आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती असो किंवा सोशल मीडियावर त्याचे चाहते सर्व भावुक झाले व त्याच्या आजवरच्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले. (MS Dhoni Retires: ICC च्या तीन मोठ्या ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी एकमेव कर्णधार, पाहा त्याच्या करिअरमधील 5 खास क्षण)

“सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद, आज संध्याकाळी 7:29 पासून मला निवृत्त समजलं जावं,” धोनीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. ट्विटरवर चकित झालेल्या चाहत्यांनी या विषयावर आपले मत व्यक्त करत पोस्ट शेअर केल्या आणि धोनीचे आभार मानले.

सर्व आठवणींबद्दल धन्यवाद!

कोणीही तुम्हाला बदलू शकत नाही

सगळ्यासाठी धन्यवाद

ब्लू जर्सीला तुझी आठवण येईल माही...

धोनीमी स्टाईलमध्ये संपवलं

हा निर्णय रिव्यू करा...

"आपण नेहमी आमचा कॅप्टन कूल रहाल"

धोनी डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. याव्यतिरिक्त फेब्रुवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये धोनीने अखेरचा टी-20 सामना खेळला. तर विश्वचषक सामन्यांच्या उपांत्य फेरीतील सामना हा त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना ठरला. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी आयपीएलमध्ये मात्र तो खेळताना दिसत राहणार आहे.