 
                                                                 मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि माजी क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambli) यांनी ग्लोबल अॅकेडमी क्रिकेट कॅम्प मध्ये बिशप शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे दिले. हा कॅम्प SRT स्पोर्ट्स व्यवस्थापन आणि Middlesex County Cricket Club (MCCC) यांनी एकत्रितपणे आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये 7 वर्षांची एकूण 150 मुलं-मुली सहभागी झाली होती.
या कॅम्पमध्ये सचिनने मुलांना स्वीप शॉट, कव्हर ड्राईव्ह, बॅटींग स्टान्स त्याचबरोबर स्पीन बॉलिंग, रनअप टी डिलिव्हरी यांसारख्या अनेक गोष्टींचे धडे दिले.
कॅम्पमधील प्रशिक्षणाचा पॅटर्न सचिन तेंडूलकर आणि MCCC यांनी मिळून ठरवला होता. खेळाडूवृत्तीचा विकास व्हावा, खेळाडूंची मानसिकता विकसित व्हावी, खेळातील बारकावे शिकायला मिळावेत या दृष्टीने हा प्रशिक्षणाचा पॅटर्न ठरवण्यात आला आहे.
याबद्दल सचिन म्हणाला की, "TMGA कॅम्पचे उद्दिष्ट फक्त चांगले खेळाडू तयार करणे नसून चांगली माणसे तयार करणे देखील आहे. तरुणांपर्यंत पोहचण्याचे माझे आणि Middlesex County चे विचार जुळून आले आणि त्यामुळेच मी इथे आलो. मी लहान असताना माझ्या वडिलांना मला जे शिकवले ते या मुलांपर्यंत मला पोहचवायचे आहे. पुढे तो म्हणाला की, माझ्या वडिलांनी मला नेहमी म्हणायचे की, तू क्रिकेट काही वर्ष खेळशील, पण चांगला माणूस होणे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
सचिन तेंडूलकरला कसोटी सामन्यात पर्दापण करुन 29 वर्ष झाली. 1989 मध्ये सचिन पाकिस्तानमध्ये त्याच्या करिअरमधील पहिला कसोटी सामना खेळला होता. यावर सचिन म्हणाला की, "वेळ निघून जाते. कराचीमधील माझ्या कसोटी सामन्यातील पर्दापणाला 29 वर्ष झाली. आणि हा मोठा योगायोग आहे की, मी इथे आहे. खूप वर्ष लोटली तरी क्रिकेट माझ्या हृदयात कायम आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजीचे कारण नाही."
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
