Pulwama Terror Attack: पुलवामा येथील भ्याड हल्ल्याप्रकरणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडूंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना
Rohit Sharma & Virat Kohli (File Photo)

Pulwama Terror Attack: पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी ट्विट केले आहे. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण?

रोहित शर्माने ट्विट करत लिहिले की, "पुलवामा येथे झालेला हल्ला धक्कादायक आणि भयंकर होता. या दिवशी आपण सगळे प्रेमाचा उत्सव साजरा करतो. मात्र काही जणांनी द्वेष पसरवला. मी सध्या शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचा विचार करत आहे. सर्व भारतीयांनी शहीद जवानांसाठी प्रार्थना करावी." (Pulwama Terror Attack: 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान देशाचं संरक्षण करण्यात अपयशी- शरद पवार)

या सर्व प्रकरणावर विराट कोहलीने लिहिले की, "पुलवामा हल्ल्याबद्दल ऐकल्यानंतर मी स्तब्ध झालो आहे. शहीद जवानांना प्रती संवेदना दाखवत जखमी जवान लवकर बरे व्हावे यासाठी विराट प्रार्थना करत आहे."

या शिवाय इतर खेळाडूंनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

14 फेब्रुवारीला दुपारी अचानक पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यासाठी IED चा वापर करण्यात आला होता. IED स्फोटानंतर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चांगला धडा शिकवा, अशी संतापाची लाट देशभरात उसळली आहे.