Pulwama Terror Attack: 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान देशाचं संरक्षण करण्यात अपयशी- शरद पवार
NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

Pulwama Terror Attack: जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या दहशतवादी हल्लानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रीया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देश शहीदांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, "राजकारण करण्याची ही वेळ नाही. मात्र 56 इंच छातील असलेल्या पंतप्रधान मोदींना देशाचं संरक्षण करण्यात अपयश आलं."

सत्तेत नसताना नरेंद्र मोदींनी दहशतवादी हल्ल्यावरुन मागील सरकारवर टीका केली होती आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी 56 इंचाची छाती हवी, असे निशाणा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर साधला होता. मोदींच्या याच वक्तव्याची शरद पवारांनी पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारला आठवण करुन दिली. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण?

पुढे ते म्हणाले की, "लष्कराच्या जवानांवर दहशतवादी हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती गंभीर असून मोदींप्रमाणे आम्ही टीका करत बसणार नाही. या परिस्थितीत शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांना आधार देणे अधिक महत्त्वाचे आहे."

14 फेब्रुवारीला दुपारी अचानक पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा अनेक राज्यकर्ते, दिग्गज, बॉलिवूडकर ते अगदी सामान्य नागरिक निषेध करत आहेत.