Team India| File Photos

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) भारताने कसोटी मालिकेमध्ये 2-1 असा विजय मिळाल्यानंतर नेटकर्‍यांनी सोशल मीडियामध्ये पुन्हा आपला व्यक्त केला आहे. या मालिकेमध्ये भारताची सुरूवात लाजिवाणार्‍या पराभवाने झाली होती पण शेवट भारताने दणक्यात केल्यानंतर टीम इंडियावर (Team India)  शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे. भारताचा पहिल्या कसोटीत पराभव झाला होता. त्यानंतर दुसरी टेस्ट भारताने जिंकली होती तिसरी मॅच ड्रॉ झाली होती तर चौथी आणि आजची शेवटची टेस्ट भारताने जिंकत क्रिकेट रसिकांना आनंद दिला आहे. दरम्यान या टेस्ट मॅच दरम्यान अनेक खेळाडूंच्या मागे दुखापतींची साडेसाती लागली होती. पण या सार्‍या अडचणींवर मात करत टीम इंडियाने आजच्या मॅच सोबतच टेस्ट सीरीज देखील खिशात घातली आहे. सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांच्या सोबतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, क्रिकेटर हरभजन सिंह यांनी देखील टीम इंडियाचं कौतुक केले आहे. IND vs AUS 4th Test 2021: शुभमन गिलची जबरा बॅटिंग, रिषभ पंतच्या अर्धशतकने टीम इंडियाचा 2-1ने रोमहर्षक विजय, Gabba येथे ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षात पहिला पराभव.

अमित शाह

 सुरेश रैना ट्वीट

(नक्की वाचा: IND vs AUS 4th Test 2021: गब्बा येथे ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित, ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय)

हरभजन सिंह ट्वीट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट

सचिन तेंडुलकर ट्वीट

विराट कोहली

भारतीय फलंदाजांनी आक्रमकता राखत संयमी खेळ करत हा विजय मिळवला आहे. आज ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मैदानावर मागील 32 वर्षांपासन ‘अजिंक्य’ असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला टीम इंडियाने पराभवाची चव चाखाली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघानं नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी 236 ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारतानं हा विक्रम मोडीत काढला आहे.