रिषभ पंत आणि शुभमन गिल (Photo Credit: Twitter/ICC, PTI)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलियाचा (Australia) 3 विकेटने दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने (Team India) ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथील अंतिम टेस्ट सामना जिंकला आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिका 2-1 अशा खिशात घातली. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा कांगारू देशात मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अ‍ॅडिलेड सामन्यात पराभूत झाल्यावर भारतीय संघाने (Indian Team) मेलबर्नमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि मालिकेतबरोबरी साधली. त्यानंतर सिडनी टेस्ट अनिर्णीत राहिल्यावर अखेरीस संघाने ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. सुंदर-शार्दूलने पहिल्या डावात संघाचे आव्हान कायम ठेवले तर सिराजने 5 कांगारू फलंदाजांना बाद करत विरोधी संघाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. त्यानंतर शुभमनच्या 91 धावांनी संघाला विजयाच्या जवळ नेले तर पंतच्या नाबाद 89 धावांच्या जोरावर टीमने विजयी रेष ओलांडली. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने 4 गडी बाद केले. (IND vs AUS 4th Test 2021: रिषभ पंत एमएस धोनीच्या वरचढ, सर्वात जलद 27 डावात 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडत मिळावले मानाचे स्थान!)

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मालिका चढउतारने भरून होती. अ‍ॅडिलेडमध्ये दुसऱ्या डावात टीम इंडियाने कसोटी इतिहासातील सर्वात कमी 36 धावसंख्या नोंदवली. मात्र, दुसऱ्या मेलबर्न सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 112 आणि गोलंदाजांच्या वेगवान हल्ल्याच्या जोरावर दमदार पुनरागमन करत बरोबरी साधली. सिडनी टेस्ट सामना मनोरंजक ठरला. यजमान अखेर विजयी रेष ओलांडेल असे दिसत असताना हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी झुंज दिली आणि सामना ड्रॉ केला. बॅटिंग दरम्यान दुखापत झाली असताना वेदना सहन करत दोंघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धैर्याने सामना केला ज्यामुळे सामन्याचा निर्णय अखेरच्या सामन्यात होण्याचे निश्चित झाले. चौथ्या सामन्यात यजमान संघाने पहिल्या डावात 360 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात शार्दूल-सुंदरच्या भागीदारीने संघाला 336 धावांपर्यंत मजल मारून दिली. दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी देत कांगारू संघ 294 धावाच करू शकला आणि भारताला 328 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या विजयात तीन फलंदाजांनी अर्धशतकी भूमिका निभावली. शुभमनने सर्वाधिक 91, रिषभ पंतने नाबाद आणि चेतेश्वर पुजाराने 56 धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर 22 धावा करून परतला.

विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थित टीमने मिळवलेला विजय खरचं ऐतिहासिक ठरला. दुसरीकडे, गब्बा येथे यजमान संघाचा 32 वर्षातील पहिला पराभव ठरला. यापूर्वी, कांगारू संघाचा 1988 मध्ये दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाने 9 विकेटने धुव्वा उडवला होता. त्यावेळी, विव्हियन रिचर्ड्स आणि अ‍ॅलन बॉर्डर यांनी आपापल्या संघाचे नेतृत्व केले होते.