वीरेंद्र सेहवाग आणि अमित मिश्रा (Photo Credit: Facebook, PTI)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून यंदाच्या आयपीएल 14 मध्ये दुसरा सामना खेळणाऱ्या अमित मिश्राने (Amit Mishra) मंगळवारी रात्री आपल्या फिरकीने मुंबई इंडियन्सच्या  (Mumbai Indians) फलंदाजांना नाचवले. त्याने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 4 गडी बाद केले आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्ससी कंबर मोडली. यादरम्यान, माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) 2008 मध्ये आयपीएलमध्ये (IPL) पहिली हॅटट्रिक घेतलेल्या अमित मिश्राने पगार वाढवण्याची मागणी केल्याचा एक मजेशीर किस्सा सुनावला. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मिश्राने आपल्या एका ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या तंबूचा मार्ग दाखवला होता. याशिवाय किरोन पोलार्ड आणि ईशान किशन देखील अमित मिश्राचे शिकार झाले. (DC Vs MI, IPL 2021: अतितटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय; मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने पराभव)

क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, “तो (अमित मिश्रा) खूप शांत आहे, सर्वांशी मोठ्या प्रेमाने बोलतो. तो प्रत्येकात अगदी पटकन मिसळतात, म्हणूनच तो त्याच्या सहसमवेत आवडीचे बनतात. जेव्हा त्याला मार पडते तेव्हा इतर खेळाडूंना वाईट वाटते आणि जेव्हा तो विकेट घेतो तेव्हा प्रत्येकजण त्याच्यासाठी आनंदी असतो.” विशेष म्हणजे आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या काही मोजक्या गोलंदाजांमध्ये मिश्राचा समावेश आहे. “मला आठवतंय की (अमित मिश्रा) त्याने पहिली हॅटट्रिक कधी घेतली होती. तुला काय हवे आहे म्हणून मी विचारले आणि तो म्हणाला, ‘वीरू भाई, कृपया माझे मानधन वाढवून द्या.’ आता मला वाटते की त्याला इतके पैसे मिळतील की दुसरी हॅटट्रिक घेतल्यानंतरही तो आपला पगार वाढवण्यास सांगणार नाही.

सामन्यानंतर अमित मिश्रा म्हणाला की त्याने तेच केले जे तो गेल्या 14 वर्षांपासून करत आहे. मिश्रा म्हणाला, “मी फक्त एका चांगल्या क्षेत्रात चेंडू टाकून विकेट घेण्याचा प्रयत्न करीत होतो. माझी शैली बॉलला स्लो डीप करवण्याची आहे. मी हे 14 वर्षांपासून करत आहे आणि जास्त बदल करण्याचा विचार करत नाही. रोहित आणि पोलार्डसारख्या मॅचविजेते खेळाडूंना बाद करण्याचा मी प्रयत्न करत असतो. सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आम्ही या विजयामुळे खूप खूष आहोत.”