रिषभ पंत (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 2021) 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 6 विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकूण मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली. परंतु, त्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर मुंबईचा संपूर्ण संघ डगमताना दिसला. दरम्यान, दिल्लीच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या संघाने अखेर गुडघे टेकले. ज्यामुळे मुंबईच्या संघाला 20 षटकात केवळ 137 धावापर्यंतच मजल मारता आली आहे. या हंगामात दिल्लीने सलग तिसरा विजय मिळवला आहे.

रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकात मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर डि कॉक 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवने संघाचा डाव संभाळला. पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईचा स्कोर 1 बाद 55 इतका होता. परंतु, सातव्य षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या आवेश खानने सुर्यकुमारला (24) माघारी धाडले. त्यानंतर अमित मिश्राने रोहित शर्माला 44 धावांवर असताना बाद केले. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. दरम्यान, हार्दिक पांड्या , कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर ईशान किशन आणि जयंत यादव यांनी छोटीशी भागीदारी केली. ज्यामुळे संघाला 137 धावापर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून अमित मिश्राने 4 तर, आवेश खान 2 विकेट घेतले आहेत. हे देखील वाचा- CSK: महेंद्रसिंह धोनीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार- मायकल वॉन

ट्वीट-

मुंबई इंडियन्सचा संघ येत्या 23 एप्रिलला पंजाब किंग्जसोबत भिडणार आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना सनराईज हैदराबाद विरुद्ध 25 एप्रिलला खेळला जाणार आहे.