रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

आयपीएल संघांना (IPL Teams) बीसीसीआयच्या एसओपीमध्ये (BCCI SOP) नमूद केलेल्या सहा दिवसांऐवजी युएईमध्ये (UAE) खेळाडूंसाठी तीन दिवसांना क्वारंटाइन ठेवण्याची इच्छा आहे आणि “पुरेशी” अ‍ॅडव्हान्स नोटीस देऊन संघ आणि कुटूंबातील जेवणाचे आयोजन करण्यासाठी मंडळाची परवानगीही मागितली आहे. युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier Leaguea) होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेतला की युएईला पोहचल्यानंतर सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, क्वारंटाइन कालावधीच्या पहिल्या, तिसर्‍या आणि सहाव्या दिवशी खेळाडू आणि क्रीडा कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट केली जाईल. कोरोना टेस्ट नकारात्मक आल्यानंतरच त्यांना प्रशिक्षणाची परवानगी दिली जाईल. स्पर्धेच्या 53 दिवसांच्या प्रत्येक पाचव्या दिवशी कोरोना घेतली जाईल. (IPL 2020 Update: आयपीएलमध्ये मोठा नियम; प्रत्येक 5 व्या दिवशी खेळाडूंची होणार कोरोना व्हायरसटेस्ट, परिवाराने बायो-बबलचे उल्लंघन केल्यास 7 दिवस ठेवणार क्वारंटाइन)

हॉटेलमध्ये कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीद्वारे बाहेरून भोजन मागितले जावे या विनंतीसह अन्य मुद्द्यांवर बुधवारी संध्याकाळी आयपीएल अधिकाऱ्यांसमवेत टीम मालकांच्या बैठकीत चर्चा होईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “बर्‍याच खेळाडूंकडे मागील 6 महिन्यांत खेळाचा जास्त वेळ मिळालेला नाही आणि ते शक्य तितक्या सरावासाठी उत्सुक आहेत,” अधिकाऱ्याने सांगितले. "वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यानुसार, आम्ही 6 दिवसांऐवजी 3 दिवस क्वारंटाइन ठेवून खेळाडूंना बबलमध्ये राहून सराव करण्यास परवानगी देऊ शकतो का?” फ्रेंचायझीच्या चिठ्ठीतील मुद्दा आहे ज्यावर बैठकीत चर्चा केली जाईल.

दरम्यान, बीएससीआयने 20 ऑगस्ट पूर्वीच संघांना युएईला न जाण्यास सांगितले आहे. चेन्नई सुपर किंग्ससह काही संघांना लवकर जाण्याची इच्छा होती. दुसरीकडे, बीसीसीआयच्या एसओपीनुसार, खेळाडू आणि टीम मालकांच्या कुटुंबीयांनाही आयपीएल दरम्यान जैव-सुरक्षित वातावरणात रहावे लागेल. त्याबाबत बीसीसीआयनेही आढावा घ्यावा अशी संघांची इच्छा आहे. “सध्या एसओपी सूचित करते की ते बबलचा भाग असल्याशिवाय ते पथकांशी संवाद साधू शकत नाहीत. मालक बबलमध्ये 3 महिने घालवू शकणार नाहीत. म्हणून, मालक आणि कुटूंबियांशी वारंवार घडणार्‍या संपर्कासाठी विचारात घेता येईल असा कोणता विशिष्ट प्रोटोकॉल आधारित वैद्यकीय सल्ला आहे का?” यावरही चर्चा केली जाईल.