IPL 2020 Update: आयपीएलमध्ये मोठा नियम; प्रत्येक 5 व्या दिवशी खेळाडूंची होणार कोरोना व्हायरसटेस्ट, परिवाराने बायो-बबलचे उल्लंघन केल्यास 7 दिवस ठेवणार क्वारंटाइन
अल्जारी जोसेफ (Photo Credit: IANS)

भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना युएईमध्ये प्रशिक्षण देण्यापूर्वी कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट कमीत-कमी पाच वेळा नकारात्मक येणे आवश्यक असेल आणि त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) दरम्यान दर पाचव्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात येईल, असे बीसीसीआयने (BCCI) तयार केलेल्या मसुद्यात म्हटले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने PTIला सांगितले की, सर्व भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना त्यांच्या संबंधित संघांसमवेत 14-दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत सामील होण्याच्या एका आठवड्यापूर्वी 24 तासांच्या अंतरावर दोन कोविड-19 RT-PCR टेस्ट कराव्या लागतील. कोणतीही व्यक्ती सकारात्मक आढळ्यास तिला 14 दिवस क्वारंटाइन केले जाईल. क्वारंटाइननंतर त्याला 24 तासांच्या आत आणखी दोन कोविड-19 आरटी-पीसीआर टेस्ट कराव्या लागतील आणि ते नकारात्मक झाल्यास, युएईला (UAE) जाण्यासाठी परवानगी देण्यात येईल. (VIVO to Exit From IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग 13 चे शीर्षक प्रायोजक म्हणून 'विवो'ची एक्सिट- रिपोर्ट्स)

"युएईमध्ये पोहचल्यानंतर, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना आठवड्याच्या क्वारंटाइन ठेवण्याच्या वेळी कमीतकमी तीन टेस्ट्स पुन्हा कराव्या लागतील आणि जर ते नकारात्मक असतील तर ते बायो-बबलमध्ये प्रवेश करून प्रशिक्षण सुरू करू शकतात. संघांकडून आलेल्या अभिप्रायानुसार या प्रोटोकॉलमध्ये किरकोळ बदल होऊ शकतात पण खेळाडू आणि संघाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही," अधिकाऱ्याने सांगितले. युएईमध्ये पहिल्या आठवड्यात खेळाडू आणि संघातील अधिकारी यांना हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची यूएईमध्ये क्वारंटाइन दरम्यान 1, 3 आणि 6 व्या दिवशी चाचणी केली जाईल आणि त्यानंतर 53-दिवसीय कार्यक्रमादरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी त्यांची चाचणी घेतली जाईल. कोणतीही व्यक्ती सकारात्मक आढळ्यास त्याला युएईमध्ये 14-दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल, शिवाय परदेशी खेळाडू आणि अधिकाऱ्यांची 2 कोविड-19 टेस्ट नकारात्मक आल्यास ते युएईसाठी रवाना होऊ शकतात.

दुसरीकडे, बीसीसीआयने खेळाडूंच्या पत्नी/गर्लफ्रेंड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रवासाबाबत निर्णय फ्रँचायझींकडे सोडले आहे, परंतु जर त्यांना क्रिकेटपटू व सहाय्यक कर्मचार्‍यांना सोबत घ्यायचे असेल तर त्यांना कठोर जैव-सुरक्षित प्रोटोकॉल पाळावे लागतील. जैव-बबल बाहेरील कोणालाही भेटण्याची कुटूंबांना परवानगी नसेल आणि इतर कुटूंब व खेळाडूंशी संवाद साधताना सोशल डिस्टंसिंगचा सराव करावा लागेल, तेदेखील फेसमास्कद्वारे. आणि जर कोणी बायो-बबल प्रोटोकॉलचा भंग केला तर त्याला सात दिवस स्वत:ला क्वारंटाइन केले जाईल आणि 6 आणि 7 व्याज दिवशी दोन नकारात्मक टेस्ट केल्यावरच त्यांना बायो-बबलमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल," अधिकाऱ्याने पुढे म्हटले.