IND vs WI (Photo Credit - Twitter)

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात खेळल्या जाणार्‍या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 12 ऑगस्ट 2023 रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अमेरिकेतील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. वेस्ट इंडिजने पहिले दोन टी-20 सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र, मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत सात विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या बाजूने मालिका सध्या 2-1 अशी बरोबरीत आहे. भारताला निर्णायक सामन्यात विजय मिळवून मालिका कायम ठेवायची आहे, तर वेस्ट इंडिजला हा सामना जिंकून त्यावर कब्जा करायचा आहे.

कधी आणि कुठे पाहणार सामना?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळली जाणारी टी-20 पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 12 ऑगस्ट 2023 रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अमेरिकेतील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. ही मालिका मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल. तसेच मालिका डीडी स्पोर्ट्सवर टीव्हीवर पाहता येईल.

कोण कोणावर भारी?

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात आतापर्यंत 28 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 18 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने 9 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. (हे देखील वाचा: IND vs WI 4th T20I: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चोथा टी-20 सामना होणार फ्लोरिडामध्ये, येथे जाणून घ्या मैदानाची आकडेवारी)

पहा दोन्ही संघ:

टीम इंडियाचा संघ – इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज संघ - रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.