आषाढी एकादशीसाठी पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीकडून CM Devendra Fadanvis यांना महापुजेचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरवर्षी प्रथेनुसार, आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रूक्मिणीची पूजा केली जाते. यंदा 6 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. तत्पूर्वी आज 'वर्षा' बंगल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले. यावेळी राज्य शासनाने आषाढी वारीतील दिंड्यांना दिलेले अनुदान आणि टोलमाफीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार देखील व्यक्त केले आहेत.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आगामी वारी व आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण दिले. याप्रसंगी राज्य शासनाने आषाढी वारीतील दिंड्यांना दिलेले… pic.twitter.com/9XCpcRvLoR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)