Woman From Falling Off Moving Train In Bihar| X/@RPF_INDIA

Viral Video: बिहारमधील मोतिहारी येथे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला. एक महिला ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ती चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडली. आरपीएफ जवानाने महिलेला प्लॅटफॉर्मच्या दिशेने ओढत महिलेचा जीव वाचवला. आरपीएफ जवानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून हातात असलेले पॅकेट फेकून दिले आणि महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही संपूर्ण घटना पूर्व चंपारण जिल्ह्यातील चकिया स्टेशनची आहे. जिथे ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ जवान जयप्रकाश यादव यांच्या धाडसाने रेल्वे रुळांच्या मध्ये पडलेल्या एका महिला प्रवाशाला जीवनदान मिळाले. ही महिला पाटणाला जात होती. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने चढताना तिचा तोल गेला, त्यानंतर ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडखळली. सुदैवाने, प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला. (हेही वाचा - Ahmedabad Plane Crash New Video: अहमदाबाद विमान अपघाताचा नवीन व्हिडिओ व्हायरल; आगीतून जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीवरून मारल्या उड्या)

RPF जवानाने वाचवले चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या महिलेचे प्राण - 

जवानाने महिलेचा जीव वाचवल्यानंतर, प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांनी जवानाचे कौतुक केले. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांनीही या कृत्याचे कौतुक केले.