Ahmedabad Plane Crash New Video (Photo Credit - @Mukundshahi73)

Ahmedabad Plane Crash New Video: अहमदाबाद विमान अपघाताचा (Ahmedabad Plane Crash) एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. एअर इंडियाचे विमान (Air India Plane) मेडिकल हॉस्टेलला धडकले तेव्हा विमान आणि हॉस्टेलच्या परिसरात मोठी आग लागली. या आगीतून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या इमारतीवरून उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी एकमेकांना इमारतीवरून उडी मारण्यास मदत करत आहेत. ते कपड्यांच्या मदतीने इमारतीवरून उडी मारत आहेत. त्याच वेळी एअर इंडियाचे विमान शेजारी कोसळल्याने धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

अपघाताच्या वेळी काही लोक झाडांवर चढून विमान जळताना पाहत आहेत. विमान अपघातानंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अपघाताच्या पहिल्या काही सेकंदात, प्रत्यक्षदर्शीला नेमके काय घडले हे समजू शकले नाही? दरम्यान, सोमवारी अहमदाबाद विमान अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये एकमेव वाचलेला प्रवासी विश्वास कुमार रमेश अपघातस्थळावरून बाहेर पडताना दिसत होता. त्याच्या मागे वसतिगृहाच्या छतावर पडलेले संपूर्ण विमान जळताना दिसत होते. (हेही वाचा - 'Air India Flight AI159 आज रद्द होण्यामागे तांत्रिक दोष नव्हे तर विमानाची अनुपलब्धता' - Air India चं स्पष्टीकरण जारी)

अहमदाबाद विमान अपघाताचा नवीन व्हिडिओ - 

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला होता. या विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह एकूण 242 लोक होते. त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानाच्या 11-ए सीटवर बसलेला फक्त एक प्रवासी वाचला. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला. सोमवारी विजय रुपाणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.