Mumbai Rains: मुंबई मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी; Powai Lake झाला ओव्हरफ्लो
आज मुंबई, ठाण्याला आयएमडी कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अधून मधून मुंबईच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
मुंबई मध्ये सध्या अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईमध्ये काही भागात सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई महानगर पालिकेचा कृत्रिम तलावापैकी एक पवई तलाव आज सकाळी 6 वाजता ओव्हर फ्लो झाला आहे. या तलावाची क्षमता 545 कोटी लीटर आहे. या पाण्याचा वापर औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी होतो. आज मुंबई, ठाण्याला आयएमडी कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अधून मधून मुंबईच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
मुंबई मध्ये पावसाला सुरूवात
#WATCH | Maharashtra | Heavy rain lashes several parts of Mumbai city. Generally cloudy sky with heavy rain is expected in the city, as per IMD. pic.twitter.com/IEMgGQX0W8
— ANI (@ANI) June 18, 2025
पवई तलाव ओव्हर फ्लो
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
🔹५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक… pic.twitter.com/MPEQHhcQ4M
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 18, 2025
मुंबई मधील हवामान अंदाज
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 09:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

