IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंड ठरला ऐतिहासिक विजेता, क्रिकेट विश्वातून कौतुकांचा वर्षाव, पाहा प्रतिक्रिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Chmpionship) अंतिम सामना साऊथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने (New Zealnd) बलाढ्य भारताला (India) 8 विकेटने पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. टीम इंडियाने (Team India) किवी संघासमोर विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे त्यांनी दुसर्‍या डावात दोन विकेट्स गमावून गाठले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 52 आणि रॉस टेलर 47 धावांवर नाबाद राहिला. भारताचा दुसरा डाव 170 धावांवर कमी झाला. किवी संघाच्या ऐतिहासिक विजयावर क्रिकेट विश्वातून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय दिग्गज खेळाडूंपासून अनेक विदेशी माजी खेळाडूंनी किवी संघाचे आयसीसीच्या पहिल्या जेतेपदाबद्दल अभिनंदन केले. पाऊस आणि खराब प्रकाशाने बाधित या सामन्याचा निर्णय अखेर सहाव्या, राखीव दिवशी लागला. (ICC WTC Final 2021: न्यूझीलंडने भारताला पाजले पराभवाचे पाणी, 'हे' खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाचे खलनायक!)

'न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल अभिनंदन, टीम इंडियासाठी टाळ्या...' BCCI ने लिहिले.

कोण म्हणाले चांगले खेळाडू पहिले शकत नाही!

पूर्णपणे पात्र चॅम्पियन्स

न्यूझीलंडची सातत्य कौतुकास्पद आहे...

पात्र चॅम्पियन्स!

अद्भुत क्रिकेट प्रवासाबद्दल अभिनंदन

न्यूझीलंडने अखेर दोन दशकांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.

पूर्णपणे तेजस्वी प्रयत्न

आपण यास पात्र आहात!

सनसनाटी!!

एक संघ म्हणून उत्कृष्ट कामगिरी!

खूप अभिमान!

न्यूझीलंडचे अभिनंदन

दरम्यान, या सामन्यातील 2 दिवस पावसामुळे वाया गेले असल्याने बुधवार, 23 जून राखीव दिवशीही खेळ झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद 96 धावांची अर्धशतकी भागीदारी केली आणि न्यूझीलंडला 21 वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद मिळवून दिले. यापूर्वी न्यूझीलंडने अखेर आयसीसी विजेतेपद 2000 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवले होते. त्यावेळी देखील किवी संघाने अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाची धूळ चारली होती.