Rishabh Pant Denied Boundary by Umpire: चेंडू सीमापार जाऊनही रिषभ पंत याला नाहीच मिळाला चौका, अंपायरच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर युजर्सची बॅटींग
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लंडच्या (England) भारत दौऱ्यादरम्यान अंपायरांचे निर्णय चांगलेच चर्चेत राहिले. Umpire's Call निर्णयावरून नाराजी व्यक्त होता असताना वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात अंपायरच्या एका निर्णयाचा टीम इंडिया (Team India) आणि रिषभ पंतला (Rishabh Pant) मोठा फटका बसला. भारतीय डावाच्या 40व्या ओव्हरमध्ये रिषभ पंतने टॉम कुरनच्या (Tom Curran) अखेरच्या चेंडूवर रिव्हर्स-स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि इंग्लंडने पायचीतसाठी अपील केली आणि पंचांनी पंतला बाद देखील दिले. या दरम्यान चेंडू सीमारेषे पार गेला. मात्र, पंतने लगेचच रिव्यू घेतला तेव्हा रिप्लेमध्ये चेंडू पंतच्या बॅटला लागले असल्याचे स्पष्ट झाले आणि पंतला थर्ड अंपायरने नॉट आऊट घोषित केले. मात्र मैदानावरील पंचांनी त्याआधीच त्याला आऊट दिले असल्याने नियमानुसार तो डेड बॉल ठरला होता. त्यामुळे चेंडू बाउंड्रीपार जाऊन देखील भारताला एकही धाव मिळाली नाही. (IND vs ENG 2nd ODI 2021: रिषभ पंतचे इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण, भारतीय फलंदाजाच्या खेळीवर Michael Vaughan यांनी उधळली स्तुतीसुमने, पहा Tweet)

अंपायरच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर युजर्सने पंचांना ट्रोल करत मजेशीर प्रतिक्रियांनी त्यांची धुलाईचं केली. पंतने यापूर्वी टी-20 आणि कसोटी सामन्यात अनुक्रमे जोफ्रा आर्चर व जेम्स अँडरसनच्या चेंडूवर यशस्वीरित्या रिव्हर्स स्वीप शॉट खेळला आहे पण यंदा मात्र तो अपयशी ठरला. प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे क्रिकेटमधील काही नियम नेहमीच चर्चेत असतात. डीआरएसमध्ये Umpire’s call आणि गेल्या काही दिवसांपासून सॉफ्ट सिग्नल आधीच चर्चेत राहिला आहे.

दोनदा गोंधळ केला!

आयसीसी कधी बदलणार नियम?

अंपायरच्या निर्णयानंतर...!

सामन्यापूर्वी पंच वीरेंद्र शर्मा!

आऊट द्यायची काय घाई होती!

अंपायर वीरेंद्रचे आजचे निर्णय पाहिल्यानंतर पंत...!

दरम्यान, डीआरएसच्या एका नियमामुळे भारताला या चार धावा मिळाल्या. आयसीसीह्या या नियमानुसार जर मैदानावरील अंपायरने फलंदाजाला बाद दिले असेल, तर तो चेंडू निर्धाव समजला जातो. त्या चेंडूवर काढलेल्या धावा देखील मोजल्या जात नाहीत, मात्र चेंडू ग्राह्य नक्कीच धरला जातो. त्यामुळे अंपायरने चुकीचं आऊट दिल्यावर फलंदाज डीआरएसच्या मदतीने निर्णय रिव्यू करू शकतो मात्र धावांच्या बाबतीत रिकाम्या हातीच परतावे लागते. या प्रकरणात देखील पंचने पंतला बाद दिले आणि त्यानंतर चेंडू सीमारेषे पार गाला. म्हणूनच, जेव्हा त्याला बाद केले गेले तेव्हा चेंडू कोठे गेला किंवा फलंदाजाने एक किंवा दोन धावा घेतल्या काही फरक पडत नाही.