IND vs ENG 2nd ODI 2021: भारतीय संघाचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant)आपल्या खेळीत मागील अनेक वर्षत मोठा सुधार केला आहे. भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील मालिके दरम्यान सोशल मीडियावर सक्रिय असलेले इंग्लिश संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) देखील पंतच्या खेळीवर फिदा झाले आणि सोशल मीडियावर्ण अकाउंट ट्विटरवर स्तुतीसुमने उधळली. इंग्लंडविरुद्ध पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पंतने 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 77 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाने अवघ्या 158 धावांवर 3 विकेट गमावल्यावर फलंदाजीला आलेल्या पंतने केएल राहुलला प्रभावी साथ दिली आणि इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. पंत आणि राहुलमध्ये पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली ज्याने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया मजबूत केला. (IND vs ENG 2nd ODI 2021: केएल राहुलचे धमाकेदार शतक, विराट-पंतचा अर्धशतकी तडाखा; भारताचे इंग्लंडला विजयासाठी 337 धावांच तगडं आव्हान)
वॉन यांनी ट्विटर पोस्टद्वारे पंतच्या खेळीची प्रशंसा केली आणि म्हणाले की, “आत्तासाठी बार सोडण्यासाठी आपल्याला एखादा खेळाडू निवडायचा असेल तर माझ्यासाठी असेल, रिषभ पंत, त्याला खेळताना पाहणे अगदी विलक्षण आहे...” विराट बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या पंतने 38व्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकला आणि फटकेबाजीला सुरुवात केली. पंत आणि राहुलच्या जोडीने आक्रमक पवित्रा घेत संघाला द्विशतकी धावसंख्या गाठून दिली. यानंतर, पंतने जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आणि अवघ्या 28 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतकी धावसंख्या गाठली. राहुल आणि पंतने 113 धावांची शतकी भागीदारी करत संघाच्या तीनशे पार धावसंख्येचा मोलाचा वाटा उचलला.
If you had to choose one player to leave the bar for right now mine would be @RishabhPant17 ... he is absolutely fantastic to watch ... #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 26, 2021
दरम्यान, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया 1-0 अशा आघाडीवर आहेत. त्यामुळे, आजच्या दुसऱ्या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब करत यजमान संघ इंग्लिश संघाचा द्विपक्षीय मालिकेत सफाया करण्याच्या निर्धारित असेल. यापूर्वी, भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 3-1 आणि पाच सामन्यांची टी-20 मालिकेत 4-1 असा विजय मिळवला होता.