
इंग्लंड (England) मध्ये चालू असलेल्या विश्वकप 2019 मध्ये प्रत्येक संघाचे 4 ते 5 सामने झालेले आहेत. त्यामुळे सर्वे देश आता सेमीफायनल च्या लढती साठी सज्ज होत आहे. यंदाच्या विश्वकप हा राऊंड रॉबीन (Round Robin) पध्दतीने होत असल्याने प्रत्येक संघाचे 9 सामने होणार आहेत. यानंतर ICC गुणातालिकेत पहिल्या चार क्रमांकावर असलेले संघ सेमीफायनलमध्ये जातील. (ICC Cricket World Cup 2019: टीम इंडिया मधील 'हा' सलामीवीर बनू शकतो 'मॅन ऑफ द टूर्नामेंट')
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया (Australia), श्रीलंका (Sri Lanka), दक्षिण आफ्रिका (South Africa), पाकिस्तान (Pakistan), वेस्ट इंडिज (West Indies), इंग्लंड, अफगाणिस्तान (Afghanistan) आणि बांगलादेश (Bangladesh) या संघांनी 5 सामने खेळले आहेत. तर, न्यूझीलंड (New Zealand) , भारत (India) यांनी 4 सामने खेळले आहेत. ICC गुणतालिकेत इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे, तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. विश्वकप मधील सेमीफायनल 9 जुलैपासून खेळाला जाईल. पहिला सेमीफायनल सामना 9 जुलैला मॅन्चेस्टर (Manchester) मध्ये होईल तर दुसरा सामना 11 जुलैला बर्मिंघम (Birmingham) मध्ये होईल. अंतिम सामना 14 जुलैला लॉर्डस (Lords) वर होणार आहे.
या संघाना मिळेल सेमीफायनल चे तिकीट
प्रत्येकी चार-पाच सामने खेळल्या नंतर इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा संघ पहिल्या चार मध्ये आहे. त्यामुळे, हे चार संघ जरी 1 किंवा 2 सामने हरले तरी किंवा अनिश्चित राहिले त्यांचे पहिल्या चार मध्ये येणे निश्चित असून या चार संघाना सेमीफायनल चे तिकीट मिळू शकते.
भारतासाठी सोपी वाट
विश्वकप मध्ये भारताचे आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. यातील न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला तर संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या संघाला पराभूत केलेले आहे. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश, आणि श्रीलंका संघा विरुद्ध होईल. त्यामुळे संघाने आपले बाकीचे सामने जिंकल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.