30 मे पासून सुरु झालेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात (ICC World Cup) टीम इंडियानी (Team India) आतापर्यंत तीन विजय प्राप्त करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरोधी पहिल्याच सामन्यात विराट ब्रिगेडने 6 गडी राखत दमदार सुरवात केली होती. त्यांनतर आपल्या जोरदार खेळीने त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघाला देखील पराभूत केले होते. पावसाच्या आगमनामुळे भारताचा न्युझीलँड (New Zealand) सोबतच सामना रद्द झाला होता पण त्यानंतर पुन्हा रविवारी पाकिस्तानच्या (Pakistan) संघाचा धुव्वा उडवला . भारतीय संघाच्या यशोगाथामध्ये यंदा फलंदाजांचं खास योगदान पाहायला मिळत आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एकापाठोपाठ एक सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन पाहता यंदाच्या 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' (Man Of The Tournament) पुरस्कारासाठी त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
रोहित शर्मा ने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यात नाबाद 122 धावांचा मजल गाठला होता तर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सामन्यात देखील त्याने अर्धशतक लावत टीम इंडियाच्या विजयाला हातभार लावला होता. यानंतर रविवारी 16 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान या बहुचर्चित सामन्यात रोहितने 140 धावा केल्या, ज्यामध्ये 14 चौकार व 3 षटकार लावत त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली होती. क्रिकेट विश्वातील चर्चांच्या नुसार आता येत्या सामन्यात देखील जर का रोहितने आपल्या खेळाचा हाच दर्जा कायम ठेवला तर यंदाच्या मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्करसाठी त्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित शर्माच्या फॅन्स सोबतच भारताचा माजी क्रिकेट वीर युवराज सिंह याने देखील अलीकडेच एक ट्विट करत रोहित मॅन ऑफ द सीरिज बानू शकेल असा विश्वास दर्शवला होता. त्यामुळे आता येत्या सामन्यात रोहितच्या खेळावर सर्वांचेच लक्ष असणार आहे. IND vs PAK, CWC 2019: 'पाकिस्तान'च्या फलंदाजांना टिप्स देण्याच्या प्रश्नावर 'रोहित शर्मा'चे हिट उत्तर, पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर (Watch Video)
युवराज सिंग ट्विट
Chatting to Rohit at ipl time ! Discussion about getting starts but not getting big runs , and I was like you don’t know what lies ahead of you it’s happening for a reason ! Same words told to me by @sachin_rt before 2011 wcup , my mos of 2019 prediction from india @ImRo45
— yuvraj singh (@YUVSTRONG12) June 16, 2019
रोहितच्या बरोबरीनेच बांगलादेशचा आक्रमक फलंदाज शाकिब अल हसन याने देखील आता पर्यंत दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. सद्य घडीला शाकिब हा स्पर्धेतील धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रगण्य आहे.दरम्यान रविवारच्या सामन्यांनंतर भारतीय संघाला दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. यानंतर शुक्रवारी 21 जून ला IND vs AFG हा सामना खेळला जाणार आहे.