IND vs PAK, CWC 2019: 'पाकिस्तान'च्या फलंदाजांना टिप्स देण्याच्या प्रश्नावर 'रोहित शर्मा'चे हिट उत्तर, पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर (Watch Video)
Rohit Sharma (Photo Credit: PTI)

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा बहुप्रतीक्षित सामना काल मँचेस्टर (Manchester) मध्ये पार पडला, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या शिलेदारांनी पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानी बॉलर्सची धुलाई करायला सुरवात केली होती. प्रथम फलंदाजी करत भारताने 337 धावांचे लक्ष पाकिस्तानसमोर ठेवले यात टीमचा सलामीवीर रोहित शर्मा याने कालच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 3 षटकार व 14 चौकार लावून 140 धावा करून दमदार सादरीकरण केले. यानंतर रोहित ला मॅन ऑफ द मॅच (Man Of The Match)  चा मान देऊन गौरवण्यात आले. मात्र मैदानासोबतच काल मॅच नंतर बोलत असताना देखील रोहितने पाकिस्तानी फलंदाजांवर असा निशाणा साधला की ऐकून सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

सामना संपल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पत्रकार परिषदेत हजेरी लावली. यावेळी एका पत्रकाराणे रोहित ला तू एक सहकारी म्हणून पाकिस्तानी खेळाडूंना विशेषतः फलंदाजांना काय सल्ला देशील असा प्रश्न केला, यावर उत्तर देताना " मी जर पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक असतो तर यावर उत्तर देऊ शकलो असतो , जर का मी कधी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली तर नक्की सांगेन पण आता मी काय सांगणार? असे रोहितने म्हंटले. IND vs PAK, CWC 2019: क्रिकेट सामन्यापूर्वी सानिया मिर्झा पाकिस्तान संघासोबत पार्टी करताना दिसली,नेटकऱ्यांकडून टीका

 

पहा काय म्हणाला रोहित..

कालच्या सामन्यातील विजयसोबतच टीम इंडिया पॉईंट टेबल मध्ये तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. आतापर्यंत भारताने चार पैकी 3सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याआधी न्यूझीलँड सोबतच सामना पावसामुळे रद्द झाला होता. येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जून ला भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना खेळला जाणार आहे.