India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा सामना आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs BAN) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium, Dubai) खेळला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. दुसरीकडे, बांगलादेशची कमान नजमुल हुसेन शांतो यांच्याकडे आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. महेदी हसन मिराज 10 धावा करुन बाद झाला आहे. बांगलादेश संघाचा स्कोअर 26/3
CT 2025. WICKET! 6.2: Mehidy Hasan Miraz 5(10) ct Shubman Gill b Mohammad Shami, Bangladesh 26/3 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)