आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चाहत्यांना आता आशिया कपचे सर्व सामने मोफत आणि HD मध्ये पाहता येणार आहेत. चाहत्यांना आता मोबाईलवर तसेच टीव्हीवरही विनामूल्य सामने पाहता येणार आहेत. यासाठी दूरदर्शनने मोठी घोषणा केली आहे. क्रिकेट चाहत्यांना डीडी स्पोर्ट्सच्या एचडी चॅनलवर आशिया कपचे सर्व सामने विनामूल्य पाहता येणार आहेत. यासाठी चाहत्यांना एक रुपयाही देण्याची गरज नाही. याआधी डीडी स्पोर्ट्स एचडी नव्हते. पण त्याची सुरुवात आशिया चषकापासून होत आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही एका मोठ्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही.
DD SPORTS is DD SPORTS HD now
➡️ Prasar Bharati, the public broadcaster of the country has added one more High-Definition Channel in its bouquet with DD Sports HD Channel
➡️ DD Sports HD to start with the telecast of ongoing Asia Cup cricket matches
Read here:…
— PIB India (@PIB_India) September 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)