जसजसे सोशल मिडियाच्या वापरात वाढ होऊ लागली, तसतसे चुकीच्या माहितीचा प्रसारही वाढला. त्यात आपल्या बातमीवर, व्हिडिओवर लोकांनी क्लिक करावे म्हणून अनेक वाहिन्या क्लिकबेट टायटल्स-थंबनेल्स वापरू लागल्या. आता अनेक  यूट्यूब चॅनल्सनी चक्क पंतप्रधान आणि लोकसभा निवडणुकीबाबत खोट्या बातम्या चालवल्या आहेत. या यूट्यूब चॅनल्सनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अटक करण्यात येणार असल्याच्या खोट्या बातम्या दिल्या आहेत व यासाठी त्यांनी क्लिकबेट थंबनेल्सचा वापर केला.

‘पंतप्रधान मोदींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे’, ‘सरन्यायाधीशांनी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे’, ‘पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे’, अशा आशयाच्या थंबनेल्स या वाहिन्यांनी वापरल्या. या बातम्या व्हायरल झाल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने फॅक्ट चेकद्वारे या बनावट बातम्यांचा खंडन केले. हे सर्व दावे खोटे, पूर्णपणे निराधार असल्याचे पीआयबीने सांगितले. पीआयबीच्या तथ्य-तपासणी विभागाने स्पष्ट केले की, अशी कोणतीही गोष्ट घडली नाही. (हेही वाचा: Delhi Police: राष्ट्रपती भवनातील शपतविधी सोहळ्यावेळी कॅमेऱ्यात दिसणाऱ्या प्राण्याची ओळख पटली; दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)