केंद्रातील नवनिर्वाचीत भाजप (BJP) प्रणित एनडीए (NDA)रकारच्या शपतविधी सोहळ्यावेळी राष्ट्रपती भवनात प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये दिसलेला प्राणी नेमका कोणता? याबातबत सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र, हा कोणताही वन्य अथवा इतर प्राणी नाही. ते घरातील मांजर आहे. त्यामुळे या प्राण्यांवरुन सुरु असलेल्या चर्चा आणि अफवा यांवर विश्वास ठेऊ नये, असे स्पष्टीकरण (Delhi Police Clarification) दिल्ली पोलिसांनी सोमवारी (10 जून) दिली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्राण्याची ओळख पटल्यामुळे सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. या समारंभात 71 मंत्र्यांचा शपथविधी झाला. हे सर्वजण नवीन सरकारमध्ये मंत्रिमंडळात काम करतील.
व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
राष्ट्रपती भवनातील शपतविधी समारंभातील एक लहान व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमधून एक प्राणी भटकताना दिसला. या व्हिडिओने अनेकांचे वेधून घेतले. या प्राण्याचे चालने आणि एकूण वर्णन पाहून अनेकांनी तो बिबट्या असावा असा तर्क लावला. तसेच, काहींनी सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. (हेही वाचा, Modi Cabinet List 2024 Ministers Portfolio: 4 मंत्र्याच्या खात्यांमध्ये कोणताही बदल नाही; नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला मिळाले कोणते मंत्रिपद; पाहा संपूर्ण यादी)
दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्वरीत स्पष्टीकरण देत सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. "काही मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल काल राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रसारणादरम्यान कॅप्चर केलेली प्राणी प्रतिमा दाखवत आहेत. ही माध्यमे तो वन्य प्राणी असल्याचा दावा करत आहेत. मात्र, या प्राण्यांबद्दलचे तर्क, दावे खरे नाहीत. हा प्राणी केवळ एक घरातील मांजरे आहे, असे दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. कृपया अशा फालतू अफवांना अजिबात खरे मानू नका, असेही पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Modi Cabinet List 2024 Ministers Portfolio: 4 मंत्र्याच्या खात्यांमध्ये कोणताही बदल नाही; नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला मिळाले कोणते मंत्रिपद; पाहा संपूर्ण यादी)
एक्स पोस्ट
These facts are not true, the animal captured on camera is a common house cat. Please don't adhere to such frivolous rumours.
— Delhi Police (@DelhiPolice) June 10, 2024
भाजप खासदार दुर्गादास उईके यांच्या शपथविधीदरम्यानची घटना
भाजप खासदार दुर्गा दास उईके मंत्री आणि गोपनियतेची शपथ घेताना हा प्रसंग घडला. ते शपथ घेत असताना एक प्राणी पाठिमागून जात असल्याचे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. व्हिडिओमध्ये राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये एक सावलीचा प्राणी घुटमळत असल्याचे दिसले, ज्यामुळे काही जणांनी असा अंदाज लावला की हा एक बिबट्या आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे अफवांना अधिकच बळ मिळाले. पण दिल्ली पोलिसांनी वेळीच स्पष्टीकरण दिल्याने या प्राण्याबाबतचे वास्तव पुढे आले आहे.