Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एक माकड ऑफिसमध्ये जाऊन फाइल्स बघत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये माकड सरकारी कार्यालयात बसलेले आणि फाईल पेपर्स चेक करताना दाखवले आहे, जणू काही तो प्राणी अधिकारी आहे.  क्लिपमध्ये एक माणूस केळी दाखवतो, पण त्याला तो नकार देतो आणि इतर फायलींमधील कागदपत्रांमधून गोंधळ घालत असतो. सहारनपूरच्या बेहट सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)