Viral Video:  एका भटक्या कुत्र्याला दोन तरुणांनी मोठ्या उंचीवरून फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुजरात येथील वडोदरा गावातील सायली परिसरातील आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, प्राणी प्रेमींनी दोघांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. हा क्रुरतेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप आला आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेनंतर एफआयआर नोंदवला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन तरुणांनी कुत्र्याला विनाकारण त्रास दिला आहे. आता या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. (हेही वाचा- पिटबूल कुत्र्याचा अल्पवयीन मुलावर हल्ला, मालकाला अटक, नोएडा येथील घटना )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)