Pune News: पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर(Chakan-Shikrapur Route)गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट (Gas Tanker Explosion)झाला आहे. या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची पडझड झाली आहे. मोहितेवाडी(Mohitewadi)परिसरात आज रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांची पडझड झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. (हेही वाचा:Pune Shocker: क्रूरतेचा कळस! स्क्रू आणि लॉकने पत्नीच्या खाजगी भागाला इजा केल्याचा पतीवर आरोप, पोलिसांनी केली अटक)
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात आणली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, स्फोटात कानठळ्या बसणारा आवाज झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले. मोहितेवाडी परिसरात एक ढाबा आहे. या ढाब्यावर जेवणासाठी नेहमीच नागरकांची वाहनांची वर्दळ असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर एक गॅस टँकर उभा होता. क्षणार्धात गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.(हेही वाचा:Satara: गुजरातच्या GST आयुक्तांनी बळकावळी 620 एकर जमीन; महाबळेश्वरमध्ये नातेवाईकांसोबत खरेदी केलं संपूर्ण गाव)
चाकण-शिक्रापूर मार्गावरील मोहितेवाडी येथे गँस टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची पडझड झाली आहे.#pune #chakan #shikrapur #gas #blast #maharashtra #Viralvideo pic.twitter.com/r7df5KUGR8
— Satish Daud Patil (@Satish_Daud) May 19, 2024