Satara: गुजरातच्या GST आयुक्तांनी बळकावळी 620 एकर जमीन; महाबळेश्वरमध्ये नातेवाईकांसोबत खरेदी केलं संपूर्ण गाव
Land प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Satara: सातारा जिल्ह्यातून मोठी बातमी उघडकीस येत आहे. गुजरातच्या GST आयुक्तांनी 620 एकर जमीन बळकावळी असून महाबळेश्वर (Mahabaleshwar) मध्ये नातेवाईकांसोबत संपूर्ण गाव खरेदी केलं आहे. नंदुरबार (Nandurbar) चे रहिवासी असलेले आणि सध्या अहमदाबाद, गुजरात येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कांदाटी खोऱ्यातील तब्बल 640 एकर जमीन बळकावली आहे, असा आरोप माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या प्रकरणी संबंधितावर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असा, इशारा चंद्रकांत वळवी यांनी दिला आहे. सह्याद्री वाचवा या मोहिमेंतर्गत माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वात अतिदुर्गम आणि पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्याचा मुळशी पॅटर्न होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (हेही वाचा -Navi Mumbai: बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी नवी मुंबईत 26 वर्षीय तरुणाला अटक; कॉटन पेपर, कटर, स्पार्कल सेलो टेपच्या साहाय्याने बनवल्या नोटा)

सुशांत मोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत वळवी त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईक अशा एकूण 13 जणांनी झाडाणी हे संपूर्ण गावचं खरेदी केले आहे. त्यातून तेथील 620 एकराचा भूखंड बळकावल्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, वन संरक्षण अधिनियम 1976 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचे राजरोसपणे नियमित उल्लंघन होत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं मोरे यांनी नमूद केलं आहे.