Woman Beats Mother-in-Law At Home: घरात सासू-सासऱ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद; Watch Video
Woman Beats Mother-in-Law At Home (PC - Twitter/@fpjindia)

Woman Beats Mother-in-Law At Home: ठाणे शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. एक महिला तिच्या घरात एका वृद्ध महिलेला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करण्यात आलेली महिला व्हिडिओमधील दुसऱ्या महिलेची सासू असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ठाण्याच्या कोपरी येथील सिद्धार्थनगर परिसरातील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला वृद्ध महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. ती तिच्या सासूला घर सोडायला सांगताना दिसत आहे. प्रत्युत्तरात वृद्ध महिलेनेही सूनेला शिवीगाळ केली. त्यानंतर या व्हिडिओतील महिला वृद्ध महिलेच्या दिशेने धावते आणि तिला वर खेचते. तसेच वृद्ध महिलेला खाली जमिनीवर ढकलते. त्यानंतर ती तिच्या असहाय सासूवर अत्याचार सुरू ठेवते, जी वेदनेने आक्रोश करताना जमिनीवर पडलेली दिसते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्वयंपाकघरात एक महिला उभी असलेली पाहायला मिळत आहे. ती हे सर्व पाहत असूनही कोणताही हस्तक्षेप करत नाही. सीसीटीव्ही फुटेजनुसार, ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडली. मात्र, नुकताच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ठाणे पोलिसांचे लक्ष वेधले गेले आहे. (हेही वाचा - Man Ate Manchurian In Bengaluru Metro: तरुणाने बेंगळुरू मेट्रोमध्ये खाल्लं 'कोबी मंचुरियन'; पुढे काय झालं? तुम्हीचं पहा व्हिडिओ)

ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कापूरबावडी येथे काम करणारी कोमल ललित दयारामणी (वय 53) अशी त्यांनी वृद्ध महिलेची ओळख पटवली आहे. कोपरी पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही एफआयआर नोंदवली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, ठाणे शहर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओला उत्तर देत याप्रकरणी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले.